पुणे | Pune
पुणे शहरात (Pune City) ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्यामुळे नद्या-नाले तुडूंब भरून वाहत आहेत. रात्रभर सुरु असलेल्या पावसामुळे (Pune Heavy Rain) जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक भागांत अक्षरश छातीपर्यंत पाणी भरले आहे. तर सिंहगड रस्त्यावरील अनेक सोसायट्या पाण्याखाली गेल्या आहेत.
हे देखील वाचा : गंगापूर धरणात ‘इतके’ टक्के पाणीसाठा; जिल्ह्यातील इतर धरणांतील स्थिती मात्र चिंताजनक
मुसळधार पावसामुळे सिंहगड रस्त्यावरील (Sinhagad Road) ५ सोसायट्यांमध्ये पाणी शिरले आहे. यामध्ये एकता नगर परिसरातील द्वारका, जलपूजन, शारदा सरोवर, शाम सुंदर या सोसायट्याचा समावेश आहे. तर १४ वर्षानंतर प्रथमच नारायण पेठेत पाणी शिरले असून स्थानिक प्रशासनाकडून कुठलेही लक्ष देत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
हे देखील वाचा : इगतपुरी तालुक्यात चोवीस तासात ‘इतक्या’ मिमी पाऊस; दारणा धरणातून पाण्याचा विसर्ग
तसेच अनेक नागरिकांच्या घरात पाणी (Water) शिरल्याने घरातील सर्व सामान पाण्याखाली गेले आहे. तर अनेक घरांत पाणी घुसल्याने गाद्या भिजल्या असून अनेकांचे सामान पाण्यासोबत वाहून गेले आहे. दुसरीकडे नागरिकांना घरातून सुखरुप बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू बोटी देखील दाखल झाल्या आहेत. तसेच पुणे प्रशासनाकडून नागरिकांनी दक्षता बाळगावी, असे आवाहन करण्यात आले असून पुण्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
हे देखील वाचा : Nashik Igatpuri News : भावली धरण ओव्हरफ्लो; तालुक्यातून समाधान व्यक्त
या ठिकाणी जाण्यास नागरिकांना प्रतिबंध
खडकवासला धरणातून (Khadakwasla Dam) मुठा नदी पात्रात सकाळी सहा वाजल्यापासून ३५५७४ क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. तसेच धरण परिसरात १०० मिलिमीटर आणि घाटमाथ्यावर २०० मिलिमीटरपेक्षा जास्त सरासरी पावसाची नोंद झालेली आहे. पावसाच्या प्रमाणानुसार आणि येव्यानुसार विसर्ग पुन्हा वाढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही ठिकाणी जाण्यास नागरिकांना प्रतिबंध करण्यात आले आहे.यात भिडे पूल, गरवारे कॉलेजमधील खिल्लारे वस्ती कॉलेज परिसर, शितळा देवी मंदिर डेक्कन, संगम पूल पुलासमोरील वस्ती, जयंतराव टिळक पूल आणि होळकर पूल परिसर या ठिकाणी जाण्यास नागरिकांना प्रतिबंध करण्यात आला आहे, असे खडकवासला पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडून कळवण्यात आले आहे.
मुख्यमंत्री शिंदेंचे अधिकाऱ्यांना फिल्डवर उतरण्याचे आदेश
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी सर्व अधिकाऱ्यांना फिल्डवर उतरण्याचे आदेश दिले आहेत. तसेच सर्व नागरिकांनी काळजी घ्यावी, लोकांनी घाबरण्याचे कारण नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. याशिवाय पुण्याचे जिल्हाधिकारी, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त, एनडीआरएफ आणि लष्कराचे कर्नल यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधून त्यांना नागरिकांना मदत करण्याचे आवाहन केले आहे. तसेच वेळ पडल्यास बचावकार्यासाठी हेलिकॉप्टरची मदत घेतली जाईल, असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. त्यासोबतच नागरिकांच्या खाण्या-पिण्याची व्यवस्था करण्याचे आदेशही मुख्यमंत्री शिंदे यांनी पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
अजित पवारांनी घेतला आढावा
पुणे शहर व जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी परिस्थितीचा आढावा घेतला आहे. तसेच जिल्हा प्रशासन आणि आपत्ती निवारण यंत्रणेला बचाव व मदत कार्यासाठी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा