त्र्यंबकेश्वर | प्रतिनिधी Trimbakeshwar
येथे आज सकाळपासून दूपारपर्यंत पावसाने हजेरी लावली. त्यामुळे श्रावणनिमित्त दर्शनाला आलेल्या भाविकांची चांगलीच धावपळ उडाली.
गत दोन दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शहरात भाविक, बाजारपेठेत ग्राहक आणि नागरिकांची गैरसोय होत आहे. मात्र अनेक दिवसांनी तालुक्यात जोरदार पाऊस होत असल्याने शेतकर्यांनी मात्र समाधान व्यक्त केलेले आहे.
- Advertisement -
श्रावणमास सूरू असल्याने भाविकांची वर्दळ सुरू आहे. त्यामुळे भक्त आणि शिवभक्तांची गर्दी वाढलेली आहे. मात्र पावसातही त्यांचा उत्साह कमी झालेला दिसला नाही. भाजीबाजार, बाजारपेठेत मात्र पावसाने धावपळ उडालेली होती. तर शहरात जागोजागी पावसाच्या पाण्याने तळे साचलेले आहे.