Sunday, June 14, 2026
HomeनगरNewasa Rain : पाचेगावमध्ये पावसाचे तांडव; प्रवरा नदीवरील पूल पाण्याखाली, शेतकऱ्यांचे अतोनात...

Newasa Rain : पाचेगावमध्ये पावसाचे तांडव; प्रवरा नदीवरील पूल पाण्याखाली, शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान

पाचेगाव फाटा (वार्ताहर)

नेवासा तालुक्यातील पश्चिमेकडील पाचेगाव परिसरात शनिवारी रात्री परतीच्या पावसाने धडक दिली. अवघ्या काही तासांत तब्बल १४४ मिमी (सुमारे ६ इंच) पावसाची नोंद झाली. या मुसळधार पावसामुळे गाव व परिसरातील ओढे, नाले तुडुंब भरून वाहू लागले आणि गावाचा दुपारी तीन वाजेपर्यंत सर्वदूर संपर्क तुटला.

- Advertisement -

प्रवरा नदीवरील मुख्य पूल पाण्याखाली गेल्याने सर्व प्रकारची वाहतूक ठप्प झाली आहे. पाण्याची पातळी झपाट्याने वाढून बाजारतळापर्यंत पाणी शिरले. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कृषी क्षेत्राला यामुळे मोठा फटका बसला आहे. परिसरातील शेतकऱ्यांचे सोयाबीन, कपाशी आणि कांद्याची रोपे पाण्यात बुडाली आहेत. ऊसाची पिके अक्षरशः जमिनदोस्त झाली आहेत. पावसाच्या तडाख्याने दोन घरांच्या भिंती कोसळल्या असून दोन शेतकऱ्यांच्या विहिरीही जमीनदोस्त झाल्या आहेत.

गावाकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर पाण्याचे साम्राज्य पसरले आहे. पाचेगाव-फाटा रस्ता, पाचेगाव-खिर्डी रस्ता आणि पाचेगाव-पुंटगाव रस्ते पाण्याखाली गेले असल्याने गाव पूर्णपणे अलगद झाले आहे. वाहतूक व हालचालींवर पूर्णपणे बंदी आली आहे.

अत्यंत गंभीर परिस्थिती स्मशानभूमीमध्ये दिसून आली. पाण्याने स्मशानभूमी गाठल्याने अंत्यसंस्कार करताना ग्रामस्थांना अक्षरशः पाण्यातून वाट काढत मृतदेह दफन करावा लागला.

सध्या गावात जिकडे तिकडे पाणीच पाणी पसरलेले असून ग्रामस्थ आणि शेतकरी हतबल झाले आहेत. पिकांचे नुकसान, घरांच्या भिंती व विहिरी कोसळणे यामुळे नागरिकांमध्ये भीती व नैराश्याचे वातावरण आहे. प्रशासनाकडून तातडीने मदतकार्य सुरू करण्याची मागणी होत आहे.

परतीच्या पावसाने नेवासा तालुक्यातील पाचेगावसह परिसरातील नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत केले असून शेतकरी प्रचंड अडचणीत आले आहेत. तातडीच्या मदतीशिवाय या नुकसानीतून उभे राहणे कठीण असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

ताज्या बातम्या

मंत्री गिरीश महाजन यांच्या शिष्टाईला यश; आ.रोहित पवारांचे अन्नत्याग आंदोलन तात्पुरते...

0
पंढरपूर शेतकऱ्यांना कोणत्याही अटी-शर्तींशिवाय सरसकट कर्जमाफी देण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी पंढरपुरात सुरू केलेले अन्नत्याग आंदोलन तात्पुरते स्थगित...