Wednesday, November 6, 2024
Homeमुख्य बातम्याMaharashtra Rain Alert : पुढील ७२ तासांत राज्यातील 'या' भागांत मुसळधार पाऊस...

Maharashtra Rain Alert : पुढील ७२ तासांत राज्यातील ‘या’ भागांत मुसळधार पाऊस कोसळणार; कुठे यलो तर कुठे ऑरेंज अलर्ट

मुंबई | Mumbai

राज्यातील विविध जिल्ह्यांत ऐन गणेशोत्सवात मुसळधार पाऊस (Heavy Rain) सुरू असल्याने शेतकऱ्यांना (Farmers) मोठा दिलासा मिळाला आहे. तर दुसरीकडे आज कमी दाबाचा एक पट्टा पूर्व विदर्भापासून दक्षिण कोकणपर्यंत पुढे सरकला असल्याने पुढील ७२ तासांमध्ये राज्यातील कोकण आणि मध्य महाराष्ट्रात (Konkan and Madhya Maharashtra) मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे…

- Advertisement -

Pankaja Munde : ‘भाऊ माझा पाठीराखा’; अडचणीत सापडलेल्या पंकजांना धनंजय मुंडे देणार मदतीचा हात

याबाबत हवामान विभागाने (Meteorological Department) दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील नाशिक, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, धुळे, नंदूरबार, जळगाव, अहमदनगर, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशीव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना यलो अलर्ट (Yellow Alert) असून याठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर पुणे आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी करण्यात आला असून नागरिकांनी हवामानाचा अंदाज घेत घराबाहेर पडावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

MLA Disqualification : आमदार अपात्रता प्रकरणाबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले…

तसेच कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात पुढील ४ ते ५ दिवस तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मराठवाड्यातील (Marathwada) बहुतांश ठिकाणी आज मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच आज विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरु असून हाच पाऊस पुढचे काही दिवस कायम राहणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Asian Games 2023 : भारताची पदकांची लयलुट सुरूच; सिफ्ट सामराची नेमबाजीत सुवर्णपदकाला गवसणी

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या