नाशिक | Nashik
गेल्या दोन दिवसांपासून संततधार सुरु असलेल्या पावसाने (Rain) सोमवारी उघडीप घेतली असली तरी जिल्हाभरातील धरणांमध्ये तुडूंब साठा निर्माण झाला आहे. ऑगस्ट महिन्यापर्यंत (Month of August) २६२ मिमी इतका पाऊस झाल्याने नाशिककरांसह बळीराजा सुखावला आहे. पावसाळा सुरु झाल्यानंतर समाधानकारक पाऊस न पडल्यामुळे जिल्ह्याला मुसळधार पावसाची प्रतीक्षा लागून होती. गेल्या शुक्रवार (दि.२) पासून जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाल्याने जिल्ह्यातील महत्वाची धरणे तुडुंब भरली आहेत.
हे देखील वाचा : गंगापूर धरणात ‘इतके’ टक्के पाणीसाठा; जिल्ह्यातील इतर धरणांतील स्थिती मात्र चिंताजनक
तसेच गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यातील (District) विविध भागांत झालेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) खरीप हंगामातील पिकांना नवसंजिवनी मिळाली आहे. विशेषतः मालेगाव, नांदगाव, येवला, चांदवड, सिन्नर या दुष्काळग्रस्त भागात मुसळधार पावसाअभावी विहिरींना पाणी आले नव्हते. आता विहिरींना पाणी येण्यासारखा पाऊस पडल्याने खरिपासह रब्बीच्या पिकांनाही दिलासा मिळणार आहे. तर मका, बाजरी, कापूस, सोयाबीन, भात पिकांसाठी हा पाऊस उपयुक्त ठरला आहे. तसेच अनेक ठिकाणी भाताच्या लागवडीला प्रारंभ झाला असून शेतकरी वर्गामध्ये शेतीच्या कामांची लगबग सुरु आहे.
हे देखील वाचा : Nashik Rain News : जिल्ह्यात पावसाची संततधार; गंगापूर धरणाच्या पाणीपातळीत वाढ
तर नागरी वसाहतींमध्ये अनेक ठिकाणी पाणी शिरल्याने मोठ्या प्रमणावर नुकसान झाल्याचे चित्र आहे. प्रशासनाकडून सातत्याने नागरिकांना सुरक्षिततेबाबत आव्हान केले जात आहे. तसेच प्रशासनाने देखील जय्यत तयारी केल्याचे दिसून येते. त्यातच गेल्या दोन दिवसांत झालेल्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील धरणांच्या (Dam) पाणीपातळीत कमालीची वाढ झाली आहे. यात जिल्ह्यातील (District) मोठ्या व मध्यम अशा २४ प्रकल्पांमध्ये एकूण ५७.०९ टक्के पाणीसाठा आहे. तर गंगापूर धरण समूहात ७८.८७ टक्के इतका पाणीसाठा आहे.
हे देखील वाचा : Nashik Rain News : जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी; गंगापूर धरण ‘इतके’ टक्के भरले
कोणत्या धरणात किती टक्के पाणीसाठा
गंगापूर – ८५.८६ टक्के, कश्यपी – ५१.०३ टक्के,गौतमी गोदावरी – ८७.२६ टक्के, आळंदी – ७४.६३ टक्के,पालखेड – ६३.८६ टक्के, करंजवण – ५५.९३ टक्के, वाघाड – ७२.८१ टक्के, ओझरखेड – ३३.१० टक्के, पुणेगाव – ७६.०८ टक्के, तिसगाव – ६.३७ टक्के, दारणा – ८४.२६ टक्के, भावली – १०० टक्के, मुकणे – ५२.८४ टक्के, वालदेवी – १०० टक्के, कडवा – ८१.५८ टक्के, नांदुरमध्यमेश्वर – ०० टक्के, भोजापूर – ९६.६८ टक्के, चणकापूर – ७४.८२ टक्के, हरणबारी – १०० टक्के, केळझर – १०० टक्के, नागासाक्या – ०० टक्के, गिरणा – २६.०१ टक्के, पुनद – ५०.०८ टक्के, माणिकपुंज – ०० टक्के इतका पाणीसाठा आहे.
२० मंडळांमध्ये धुव्वाधार
जिल्ह्यातील १५ तालुक्यांमध्ये मिळून सरासरी ३७ मिमी पावसाची नोंद झाली असली तरी काही मंडळांमध्ये धुव्वाधार पाऊस झाला आहे. त्यामुळे अशा एकूण २० मंडळांमध्ये ७१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सुरगाणा आणि उंबरठाणा या दोन मंडळांमध्ये २४ तासांत विक्रमी १७१.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्याखालोखाल इगतपुरी तालुक्यातील घोटी येथेही १४०.८ मिमी पाऊस झाला. तर धारगाव, हरसूल आणि ठाणापाडा या तीन मंडळांत १०० मिमी पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. त्यासोबतच त्र्यंबकेश्वरमध्येही ६५.३ मिमी पावसाची नोंद झाली.
तालुकानिहाय पाऊस (मिली मीटर) (जुन-जुलै महिन्यापर्यंत)
मालेगाव २९४.६, बागलाण २९०.६, कळवण २५५.१, नांदगाव २९२.०, सुरगाणा ७५२.६, नाशिक २२४.४, दिंडोरी ४४७.३, इगतपुरी ८५४.२, पेठ ७७२.०, निफाड २५२.६, सिन्नर २८९.४, येवला २८७.३, चांदवड ३६२.४, त्र्यंबकेश्वर ११९७.९, देवळा ३१०.८ – एकूण.४०४.१
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा