Friday, September 20, 2024
HomeनाशिकNashik Rain News : जिल्ह्यात पावसाची संततधार; गंगापूर धरणाच्या पाणीपातळीत वाढ

Nashik Rain News : जिल्ह्यात पावसाची संततधार; गंगापूर धरणाच्या पाणीपातळीत वाढ

'या' धरणांतून विसर्ग सुरु

नाशिक | Nashik

- Advertisement -

काल रात्रीपासून नाशिक शहर परिसरासह ग्रामीण भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात (Nashik Dam Position) वाढ होतांना पाहायला मिळत आहे. तर इगतपुरी तालुक्यात जोरदार पाऊस कोसळत असल्याने दारणा धरणातून (Darna Dam) पाण्याचा विसर्ग सुरु आहे. याशिवाय नांदूरमध्यमेश्वर आणि कडवा धरणातून देखील विसर्ग सुरु करण्यात आला आहे.

हे देखील वाचा : गंगापूर धरण ‘इतके’ टक्के भरले; तर इतर धरणांतील असा आहे पाणीसाठा

तसेच जिल्ह्यातील इगतपुरी (Igatpuri) आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यात (Trimbakeshwar Taluka) काल रात्री चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे नाशिककरांची तहान भागावणाऱ्या गंगापूर धरणाचा (Gangapur Dam) पाणीसाठा ६९ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे असाच पुढे दोन ते तीन दिवस पाऊस सुरु राहिल्यास गंगापूर धरणासह जिल्ह्यातील इतर धरणांच्या पाणीपातळीत देखील वाढ होणार आहे.

हे देखील वाचा : गंगापूर धरणात ‘इतके’ टक्के पाणीसाठा; जिल्ह्यातील इतर धरणांतील स्थिती मात्र चिंताजनक

तसेच सकाळी ९ वाजता दारणा धरणातून (Darna Dam) ९ हजार ३३४ क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग दारणा नदीत सुरु करण्यात आला होता. त्यानंतर दुपारी ४ वाजता विसर्गात ३४४४ क्युसेकने वाढ करून एकूण १९९७२ क्युसेकने सोडण्यात आले. तर नांदूर मध्यमेश्वरमधून (Nandur Madhyameshwar) ४३६६ क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरु होता. त्यानंतर दुपारी ४ वाजता १११५३ क्यूसेक होता. यानंतर सायंकाळी ६ वाजता ७ हजार ७७७ क्यूसेकने वाढ करुन एकूण १८ हजार ९३० क्यूसेकने पाणी सोडण्यात येणार आहे. याशिवाय संध्याकाळी ६ वाजता कडवा धरणातून ३००० क्यूसेकने वाढ करून एकूण ८ हजार २९८ क्यूसेकने पाणी सोडण्यात येणार आहे.

हे देखील वाचा : गंगापूर धरणाच्या पाणीपातळीत दोन टक्क्यांची वाढ; पालखेडमधून होणार विसर्ग

असा आहे जिल्ह्यातील धरणांतील आजचा पाणीसाठा

गंगापूर – ६९.०० टक्के, कश्यपी – ३२.५६ टक्के, पालखेड – ५४.०६ टक्के, करंजवण – २२.८३ टक्के, वाघाड ४०.४० टक्के, दारणा – ८५.५१ टक्के, भावली- १०० टक्के, मुकणे- ३८.५० टक्के, गिरणा – १६.१२ टक्के, वालदेवी- ७८.०२ टक्के, कडवा – ८५.४३ टक्के, नांदुर मध्यमेश्वर- १०० टक्के, चणकापूर ४५.५३ टक्के, भोजापुर ४४.८८ टक्के, ओझरखेड ०.०० टक्के

मागील वर्षीचा पाणीसाठा

गंगापूर – ८०.४४ टक्के, कश्यपी – ४५.१४ टक्के, पालखेड – ५४.०६ टक्के, करंजवण – ४४.५९ टक्के, वाघाड ५४.८२ टक्के, दारणा – ८५.९३ टक्के, भावली- १०० टक्के, मुकणे- ७०.३१ टक्के, गिरणा – ३३.०५ टक्के, वालदेवी- ९२.२३ टक्के, कडवा – ८२.६४ टक्के, नांदुर मध्यमेश्वर- ९१.०५ टक्के, चणकापूर ५६.४५ टक्के, भोजापुर ५०.९० टक्के, ओझरखेड ०.०० टक्के

जिल्ह्यात पुढील पाच दिवस पावसाचा अंदाज

मुंबई वेधशाळेने पुढील पाच दिवसाचा अंदाज लक्षात घेता नाशिक जिल्ह्यात (Nashik District) दि.०३ ते ०७ ऑगस्ट २०२४ दरम्यान मध्यम पावसाची शक्यता असल्याचे म्हटले आहे. तसेच कमाल तापमान २६-३० डिग्री सें व किमान तापमान २२-२३ डिग्री सें. दरम्यान राहण्याची शक्यता आहे. त्यासोबतच वाऱ्याचा वेग १७-२८ कि.मी/तास या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. तर दि.०४ ऑगस्ट २०२४ रोजी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून नाशिक जिल्ह्याच्या घाट क्षेत्रात काही ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पाऊस व जिल्ह्याच्या मैदानी भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची दाट शक्यता वर्तविण्यात आली आहे.

त्र्यंबकेश्वर येथील गंगासागर तलाव ओव्हरफ्लो

त्र्यंबकेश्वरला पावसाची (Trimbakeshwar) संततधार सुरु असल्याने येथील गंगासागर तलाव (Gangasagar Lake) ओव्हरफ्लो झाला आहे. तीन वर्षानंतर प्रथमच हा तलाव भरून वाहत असून सिताराम बाबा आश्रम ते सूर्यनारायण मंदिर या भागात रस्त्यावर पाणीच पाणी (Water) साचल्याचे पाहायला मिळत आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या