Friday, May 3, 2024
Homeनंदुरबारनंदुरबार जिल्हयात 28, 29 सप्टेंबरला जोरदार पावसाची शक्यता

नंदुरबार जिल्हयात 28, 29 सप्टेंबरला जोरदार पावसाची शक्यता

नंदुरबार Nandurbar । प्रतिनिधी

बंगालच्या उपसागरात (Bay of Bengal) कमी दाबाचा पट्टा (Low pressure) तयार झाल्याने दि.28 व 29 सप्टेंबर रोजी जिल्हयात वीजांच्या कडकडाटासह (Lightning strikes) मुसळधार पावसाची शक्यता (Chance of torrential rain) कृषि विज्ञान केंद्राच्या(Center for Agricultural Sciences) हवामान खात्याने (weather department) वर्तविली आहे.

- Advertisement -

भारतीय हवामान विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढून त्याचे रूपांतर गुलाब चक्रीवादळामध्ये झाले आहे. हे चक्रीवादळ दि.26 ला संध्याकाळी दक्षिण ओडीसा व आंध्र प्रदेशाच्या किनार्‍याला धडकले असून, याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात पुढील 3-4 दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे.

भारतीय हवामान विभाग, प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्याकडून प्राप्त अंदाजानुसार दि. 28 व 29 सप्टेंबर 2021 रोजी नंदुरबार जिल्ह्यात बर्‍याच ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तर तुरळक ठिकाणी जोरदार (मुसळधार) पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वीजांच्या कडकडाटासह व जोरदार वारे वाहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

या पार्श्वभुमीवर शेतकरी बांधवांनी स्वतःची आणि जनावरांची काळजी घ्यावी. वीजांचा कडकडाट होण्याचा आवाज आल्यास तात्काळ सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. परिपक्व झालेले पीक काढणी केलेले असल्यास ताडपत्रीच्या सहाय्याने झाकून ठेवावे.

भाजीपाला, सोयाबीन, कापूस इतर पिकामध्ये पावसाचे अतिरिक्त पाण्याचे निचरा होण्यासाठी चर काढावी व सदरील पिकामध्ये पावसाचे अतिरिक्त पाणी साचणार नाही अशी दक्षता घ्यावी. या दोन दिवसामध्ये शेतकरी बांधवांनी कीटकनाशक फवारणी, खत देणे आदी कामे करणे टाळावे, असे आवाहन कृषि विज्ञान केंद्राच्या जिल्हा कृषी हवामान केंद्राने केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या