Wednesday, January 7, 2026
Homeब्रेकिंग न्यूजCM Devendra Fadnavis: अतिवृष्टीमुळे राज्यातील १२ ते १४ लाख एकर क्षेत्रातील पिके...

CM Devendra Fadnavis: अतिवृष्टीमुळे राज्यातील १२ ते १४ लाख एकर क्षेत्रातील पिके बाधित, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

मुंबई | प्रतिनिधी
मुंबईसह राज्यातील अनेक भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. मुंबईत काही ठिकाणी ३०० मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिवृष्टीमुळे गेल्या तीन-चार दिवसात जवळपास १२ ते १४ लाख एकर जमिनीवरील पिके बाधित झाली आहेत. नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे ८ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्य सरकार सर्व परिस्थितीवर नजर ठेवून आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टयामुळे काही भागात अजूनही रेड ॲलर्ट असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिली. मुंबईत स्वत: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रस्त्यावर उतरून परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचेही ते म्हणाले.

राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर फडणवीस यांनी आज प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना मुंबई तसेच राज्यात पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची माहिती दिली. मुंबईत काही भागात पाणी साचले होते, पण त्याचा निचरा करण्यात आला. मुंबईतील लोकल सेवा धीम्या गतीने का होईना पण सुरू आहेत. शासकीय-खासगी कार्यालयांना सुट्टी जाहीर केली असून जिथे शक्य आहे तिथे वर्क फ्रॉम होम करण्यास सांगण्यात आले आहे. राज्यात एनडीआरएफ, एसडीआरएफच्या तुकड्या सतर्क आहेत. धरणांच्या विसर्गाबाबत शेजारील राज्ये सहकार्य करत आहेत. जास्त चिंता हिप्परगीची असून तिथे विसर्ग सुरू केला आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.

- Advertisement -

लोकांची तात्पुरत्या निवाऱ्यात व्यवस्था
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर गेल्याने येथील ४०० ते ५०० लोकांना तात्पुरत्या निवाऱ्यात हलविले आहे. मागच्या काळात मिठी नदीत कसे घोटाळे झाले याच्या सुरस कथा येत आहेत. गाळ काढण्याच्या नावावर काय झाले हे पुढे आले आहे. आता नव्याने ही कामे महापालिका करत आहे, असेह फडणवीस म्हणाले.

YouTube video player

कोकण रेल्वेच्या फेऱ्यात वाढ
मुंबईतील चाकरमानी गणेशोत्सवासाठी मोठ्या प्रमाणात कोकणात जातो. त्यामुळे आम्ही केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना कोकण रेल्वेच्या फेऱ्या वाढविण्याची विनंती केली होती. त्यानुसार यावर्षी ३६७ फेऱ्या असणार आहेत. मागच्या वर्षीपेक्षा ही संख्या जास्त असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

राहुल गांधी सिरियल लायर
सीएसडीएसच्या आकडेवारीवर आकांडतांडव करत राहुल गांधी यांनी आरोप केले होते. आमच्या सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. मात्र आता सीएसडीएसनेच ट्विट करत ही आकडेवारी चुकीची असल्याचे सांगत माफी मागितली आहे. पण राहुल गांधी यांच्याकडून माफीची अपेक्षाच ठेवता येत नाही. एखादा सिरियल किलर असतो, त्याप्रमाणे राहुल गांधी हे सिरियल लायर आहेत. ते पुन्हा तेच आकडे घेऊन फिरतील, अशी टीका फडणवीस यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात केली. उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधी पक्षाने उमेदवार दिला नसता तर चांगले चित्र लोकांसमोर गेले असते, असेही फडणवीस यांनी सांगितले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Nashik Municipal Corporation Election : “फक्त एक मत मला द्या, उरलेली...

0
नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik आगामी महापालिका निवडणुकीच्या (Mahapalika Election) पार्श्वभूमीवर नवीन नाशकात (Nashik) प्रचाराला वेग आला असतानाच, काही इच्छुक उमेदवारांनी (Candidate) निवडलेली...