Friday, May 17, 2024
Homeमहाराष्ट्रपंढरपूर : 800 कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं

पंढरपूर : 800 कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं

पंढरपूर –

मुसळधार पाऊस, उजनी आणि वीर धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग, याचा परिणाम पंढरपूर शहर आणि नदीकाठच्या गावांवर झाला असून

- Advertisement -

अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती ओढावली आहे. शहरातील नदीकाठच्या जवळपास 800 कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे तसेच ग्रामीण भागात देखील नागरिकांना स्थलांतरीत केले आहे.

पंढरपूरकडे येणारे सातारा, पुणे, सोलापूर, मंगळवेढा या ठीकाणची वाहतूक बंद केली तर काही ठिकाणी वळविण्यात आल्याची माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली आहे. दरम्यान,चंद्रभागा नदीत येणारा पाण्याचा विसर्ग पाहता दुपारपर्यंत शहरातील अनेक भागात पुराचे पाणी जाण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.

पंढरपूरला अतिवृष्टीचा फटका बसला आहे. बुधवारी कुंभार घाटावरील भिंत कोसळल्याने सहा जणांचा मृत्यू झाला होता. या सततच्या पावसाने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. गेल्या 24 तासात पंढरपूर तालुक्यात तब्बल 141.89 मि.मी सरासरी पावसाची नोंद झाली आहे. यात पंढरपूर मंडळात सर्वाधिक म्हणजे 157 त्या खालोखाल पुळूज 156,चळे 152 मि.मी पावसाची नोंद झाली आहे. इतर मंडलात 130 ते 140 मि.मी. इतका मोठ्या प्रमाणत पाऊस पडला आहे. त्यामुळे परिसरातील ओढे,नाले भरून वाहू लागले.ते पाणी चंद्रभागा नादित जाऊन मिसळले. त्यात भर म्हणून उजनी आणि वीर धरणाचे पाणी मिसळून नदीने धोक्याची पातळी ओलांडली.

व्यास नारायण, अंबाबाई पटांगण,लखुबाई, आंबेडकर नगर झोपडपट्टी आदी भागातील जवळपास 500 कुटुंबांची सुरक्षित ठिकाणी व्यवस्था केली. आज सकळी अजून 300 असे एकूण 800 कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. उजनी धरण आणि वीर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत आहे. त्यामुळे शहरातील काही भागात दुपार पर्यंत पुराचे पाणी जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने जीव रक्षक, एनडीआरएफची टीम तैनात केली आहे.

नागरिकाना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तर दुसरीकडे पंढरपूर ते सातारा,पुणे,सोलापूर,मंगळवेढा याठीकाणचे पुलावर पाणी आल्याने वाहतूक बंद ठेवली आहे. काही ठिकाणी पर्यायी मार्गाने वाहतूक सुरु केली आहे .एकंदरीत एकीकडे करोनाचे संकट असताना आता दुसरीकडे पुराचा फटका तालुक्याला बसला आहे. तर या अतिवृष्टीचा फटका बळीराजाला देखील बसला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या