Friday, May 3, 2024
Homeमनोरंजनचिरंजीवीने चित्रपटाच्या शुटिंगवेळी सोनू सूदला मारहाण करण्यास का दिला नकार?

चिरंजीवीने चित्रपटाच्या शुटिंगवेळी सोनू सूदला मारहाण करण्यास का दिला नकार?

त्यामुळे रिअल लाईफ हिरो झालेला सर्वाचा लाडका अभिनेता म्हणजे सोनू सूद. लॉकडाऊन दरम्यान केलेल्या चांगल्या कार्यामुळे सोनू सूदला चित्रपट निर्माते मुख्य भूमिकेसाठी संपर्क करत आहेत. ऐवढेच नाही तर लोकं त्याची आताची प्रतिमा पाहत चित्रपटाचे स्क्रिप्ट देखील बदलत आहेत. सोनू सूदने शुक्रवारी वी द वीमेन के व्हर्चुअल सेशनमध्ये दाक्षिणात्य चित्रपट आचार्यशी संबंधित एक रंजक किस्सा सांगितलाय. सोनू सूदने सांगितल्याप्रमाणे दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवीने त्याला चित्रपटाच्या एका सीनच्या शूटिंगवेळी मारहाण करण्यास नकार दिला.

सोनू सूदने सांगितले की, आम्ही एक अ‍ॅक्शन सीक्वेन्सचे शूटिंग करत होतो. त्यावेळी चिरंजीवी सरांनी सांगितले की, या चित्रपटात तुझे असणे आमच्यासाठी मोठी समस्या आहे कारण एका अ‍ॅक्शन सीनमध्ये मी तुला मारहाण करत आहे. चिरंजीवींनी सांगितले की, जर मी असे केले तर लोकं मला शिव्या देतील. सोनू सूदने पुढे सांगितले की, चित्रपटात एक सीन आणखी होता ज्यामध्ये त्यांनी माझ्या अंगावर पाय ठेवले होते. त्या सीनचे देखील पुन्हा शुटिंग करण्यात आले.

- Advertisement -

सोनू सूदने असे देखील सांगितले की, एका तेलूगु चित्रपटाच्या निर्मात्याने माझ्या नवीन प्रतिमेनुसार त्यांच्या चित्रपटाच्या स्क्रिप्टमध्ये बदल केला. त्यामुळे त्याला चित्रपटातील त्याच्या भागाचे शुटिंग पुन्हा करावे लागले. सोनू सूदने सांगितल्याप्रमाणे, 2020 ने त्यांचे वैयक्तीक आणि व्यावसायिक जीवन पूर्णपणे बदलले आहे. त्याने सांगितले की, आता मला हिरोची भूमिका मिळत आहे. माझ्याकडे 4 ते 5 उत्कृष्ट स्क्रिप्ट आले आहेत. बघूया. ही माझी नवीन सुरुवात आहे. ही नवीन खेळपट्टी आहे जी चांगली आणि मजेदार असेल.

दरम्यान, सोनू सूदने कोरोनाच्या काळात रस्त्यावर उतरुन मजूरांसाठी मदत केली. त्यांना घरी जाण्यासाठी गाड्यांची सोय करुन दिली. ऐवढेच नाही तर त्यांना खाद्यपदार्थांचा पुरवठा सुद्धा केला. तसंच, बर्‍याच मजुरांना रोजगाराची व्यवस्था करुन दिली. सोनू सूद गरिबांसाठी आणि मजूरांसाठी रिअल हिरो झालाय. सोनू सूदने केलेल्या कार्याचे फक्त भारतातच नाही तर जगभरात कौतुक होत आहे. संयुक्त राष्ट्राने सोनू सूदच्या निस्वार्थ कार्याचे कौतुक करत त्याला संयुक्त राष्ट्राचा प्रतिष्ठित एसडीजी स्पेशल ह्यूमॅनीटेरीयन अ‍ॅक्शन अवॉर्डने सन्मानित केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या