Friday, May 3, 2024
Homeराजकीयराज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत करोनाबाधित

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत करोनाबाधित

मुंबई | Mumbai

राज्यात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. करोनाची बाधा सर्वसामान्य नागरिकांपासून ते लोकप्रतिनिधींनाही झाली आहे. आता, राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना करोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ट्वीट करत याबाबतची माहिती दिली. माझ्या करोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मी ठणठणीत असून पुढील आठवड्यात जनतेच्या सेवेत रुजू होणार, अशी माहिती उदय सामंत यांनी ट्वीटद्वारे दिले आहे.

- Advertisement -

मंत्री उदय सामंत यांनी ट्वीटमध्ये म्हंटले आहे की. ‘गेले दहा दिवस स्वतः विलगिकरणात आहे. नुकतीच कोविड टेस्ट करून घेतली. या टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. गेले दहा दिवसांत कोणाच्याही संपर्कात नसल्यामुळे इतरांना संसर्ग होण्याची शक्यता अगदी कमी आहे. तरीही माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी. मी ठणठणीत आहे. पुढच्या आठवड्यात जनतेच्या सेवेत रुजू होईन, असं सामंत यांनी म्हटलं आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या