Friday, May 3, 2024
Homeनगरबेलापूरचे व्यापारी गौतम हिरण हत्येप्रकरणी दोघे ताब्यात

बेलापूरचे व्यापारी गौतम हिरण हत्येप्रकरणी दोघे ताब्यात

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

बेलापूरचे व्यापारी गौतम हिरण यांचे अपहरण करून त्यांची हत्या केल्याप्रकरणी काही सबळ पुराव्याच्या आधारावर परिसरातील दोघा आरोपींना ताब्यात घेतले आहे.

- Advertisement -

गौतम हिरण यांच्यावर झालेल्या शवविच्छेदनानंतर त्यांचा मृत्यू हा डोक्याला मार लागून जखमी झाल्याने झाला असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली. याप्रकरणाचा संपूर्ण उलगडा लवकरच करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

बेलापूरचे व्यापारी गौतम हिरण यांच्या हत्येप्रकरणी अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी काल श्रीरामपुरात शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. याप्रसंगी अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे, पोलीस उपअधीक्षक़ राहुल मदने, पोलीस निरीक्षक संजय सानप हे उपस्थित होते.

बेलापूरचे व्यापारी गौतम झुंबरलाल हिरण यांचे 1 मार्च रोजी अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर 2 मार्च रोजी अपहरण झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणातील काही सबळ पुराव्याअभावी सागर गंगावणे व बिट्टू उर्फरावजी वायकर या दोघांना संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आले आहेत. प्रथम दर्शनी यांच्याविरुध्द काही संशयित बाबी आढळून आल्या आहेत.

या दोघा आरोपींविरुद विविध पोलीस ठाण्यात विविध प्रकारे गुन्हे दाखल आहेत. त्यांना याच परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी अद्याप बराच तपास बाकी असून तोपूर्ण तपास काही दिवसात हा तपास पूर्ण करणार असून या प्रकरणाच्या तपासासाठी केवळ पोलीस निरीक्षकच नसून आमच्या तीन पथके आहेत. त्यात मी स्वतः कालपासून श्रीरामपुरात तळ ठोकून आहे. त्यामुळे आमचे या प्रकरणाकडे संपूर्ण लक्ष असून लवकरच या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावू, असेही त्यांनी सांगितले.

या प्रकरणात कोणीही असेल तर त्याची गय केली जाणार नाही. अद्याप पूर्ण तपास झालेला नाही. त्यामुळे याप्रकरणाी पालेमुळे खोदून काढणार आहोत. त्यामुळे याप्रकरणातील आरोपी आमच्या हातून सुटणार नाहीत. त्यामुळे सर्वांनी शांतता बाळगा, आमचे काम आम्हाला करु द्या, आमचे लक्ष इतरत्र वळवू नका. तपास हा विश्वासाने करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

श्रीरामपूर शहरातील सदरचे गुन्हेगार हे वाळू प्रकरणाशी निगडीत असून त्यामुळे या ठिकाणी गुन्हेगारी बोकाळली आहे. त्यातून अशा प्रकारचे गुन्हे घडत असल्याचे पत्रकारांनी सांगून अशा लोकांविरुध्द कडक कारवाई व्हावी. त्यावर श्री. पाटील म्हणाले, या प्रकरणाचा पूर्ण तपास झाल्यानंतर वाळू प्रकरणातून तयार झालेल्या टोळ्यांचा बंदोबस्त करु, असे आश्वासन त्यांनी दिले.

एका महिन्यात 262 गुन्हयाप्रकरणात तपासात कुचराई करुन उशिराने गुन्हे दाखल केले म्हणून 22 पोलीस अधिकार्‍यांवर नोटीस देवून कारवाई केली असल्याचेही श्री. पाटील यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या