Thursday, May 2, 2024
Homeनगरकाही देशात कोव्हिडची चौथी लाट उसळल्याने आपल्याला सतर्क राहावे लागणार - गृहमंत्री...

काही देशात कोव्हिडची चौथी लाट उसळल्याने आपल्याला सतर्क राहावे लागणार – गृहमंत्री वळसे पाटील

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

आपल्याकडे जरी कोव्हिडची लाट (Wave of Covid) ओसरली असली तरी जगाच्या काही देशात कोव्हिडची चौथी लाट (Fourth wave of covid) मोठ्या प्रमाणात वाढत असून त्या ठिकाणी पूर्ण लॉकडाऊन (Lockdown) करण्यात आले असल्याने आपल्याला सतर्क राहावे लागणार आहे. त्यामुळे राज्यात चौथी लाट येऊ नये याची दक्षता घ्यावी लागणार असल्याची स्पष्टोक्ती राज्याचे गृहमंत्री ना.दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip Walse Patil) यांनी शिर्डीत (Shirdi) दिली आहे.

- Advertisement -

दरम्यान महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip Walse Patil) यांनी रविवारी सायंकाळी शिर्डीत (Shirdi) साईदरबारी हजेरी लावून धुपारतीपुर्वी साईसमाधीचे (Sai baba) मनोभावे दर्शन घेतले. यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते साईबाबांची पाद्यपूजा करण्यात आली. ना.वळसे पाटील यांचे शिर्डी (Shirdi) शहरात आगमन होताच शिर्डी शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जल्लोषात स्वागत करण्यात आले.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रमेश गोंदकर, विश्वस्त महेंद्र शेळके, अ‍ॅड सुहास आहेर, अविनाश दंडवते, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, उपकार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे, राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष संदीप सोनवणे, गौतम बँकेचे अध्यक्ष बाबासाहेब कोते, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष राकेश कोते, शिर्डी शहराध्यक्ष विशाल भडांगे, दिपक गोंदकर,अजित जगताप, गंगाधर वाघ, ऋषिकेश औटी आदी मान्यवरांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी साईमंदीर सभागृहात साईसंस्थानच्या वतीने शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी ना.वळसे पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना सांगितले की, मी साईबाबांच्या दर्शनासाठी कायम येत असतो, साईबाबांचे दर्शन घेऊन मनाला समाधान वाटले आहे. आपल्या राज्यात करोनाची लाट ओसरली असली तरी देखील दुसर्‍या देशात चौथ्या लाटचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. लॉकडाऊन होत आहे त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन त्यांनी केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या