Friday, August 21, 2026
Homeदेश विदेशअमेरिका इराण युध्दाच्या पार्श्वभूमीवर भारतात अलर्ट; गृह मंत्रालयाकडून सर्व राज्यांना पाठवलं पत्र

अमेरिका इराण युध्दाच्या पार्श्वभूमीवर भारतात अलर्ट; गृह मंत्रालयाकडून सर्व राज्यांना पाठवलं पत्र

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांचा अमेरिका-इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यात मृत्यू झाला. त्यामुळे इराण बदला घेण्याच्या मानसिकतेत आहे. इराणने इस्रायलसह ९ देशांना टार्गेट बनवले आहे. इराणशिवाय अन्य देशातही खामेनेई यांच्या मृत्यूविरोधात प्रदर्शने सुरू आहेत. याचे पडसाद आता भारतात उमटायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे भारतातील संरक्षण यंत्रणांनाही सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आल्याचे वृत्त वृत्तसंस्थांनी दिले आहे. तसंच, केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्यांनाही सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. टाइम्स नाऊने यासंदर्भातील वृत्त दिलंय.

केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, इराणवर अमेरिका आणि इस्रायल हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतात संभाव्य हिंसाचारापूर्वी सतर्क राहा. २८ फेब्रुवारीला हे पत्र प्रसारित केले होते. ज्यात राज्यांना भडकाऊ भाषण देणाऱ्या इराणी कट्टर समर्थकांची ओळख पटवा असे सांगितले होते. या पत्रात मध्य पूर्व आशियात सुरू असणाऱ्या युद्धानंतर भारतातील अनेक भागात होणाऱ्या विरोध प्रदर्शनाबाबत सतर्क केले आहे.

- Advertisement -

अनुचित घटना टाळण्यासाठी सुरक्षेत वाढ करण्याचे निर्देश
कायदा सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनाबाबतही पत्रात उल्लेख करण्यात आला आहे. तर, इस्रायल आणि अमेरिकेचे वाणिज्य दूतावास आणि इतर राजनैतिक कार्यालये असलेल्या राज्यांना कोणतीही अनुचित घटना टाळण्यासाठी सुरक्षा वाढवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

PM Narendra Modi: सध्याची परिस्थिती अत्यंत गंभीर, संकटातून बाहेर पडण्यासाठी चर्चेशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही – पंतप्रधान मोदी

भारतातही पडसाद उमटले
अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाल्यानंतर त्याचे भारतातही पडसाद उमटले. देशातील विविध शहरांमध्ये मुख्यतः शियापंथीय मुस्लिमांनी रस्त्यावर उतरून खामेनी यांच्या मृत्यूबद्दल शोक आणि संताप व्यक्त केला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मू आणि काश्मीरच्या जम्मू, श्रीनगर, बारामुल्ला, बडगाम, बांदीपुरा, अनंतनाग आणि पुलवामा येथे मोठ्या प्रमाणात लोक एकत्र आले होते. यावेळी अमेरिकाविरोधी आणि इस्रायलविरोधी घोषणा देण्यात आल्या.

लाल चौकातील परिसर सील
जम्मू काश्मीरच्या श्रीनगर भागात सरकारकडून निर्बंध लावण्यात आलेत. ज्या भागात लोकांनी उतरून खामेनेई यांच्या मृत्यूबद्दल आक्रोश केला त्या लाल चौकातील परिसर प्रशासनाकडून सील करण्यात आला आहे. क्लॉक टॉवरच्या आसपासही सुरक्षा व्यवस्था कठोर करण्यात आली आहे. सोबतच शाळा आणि कॉलेज पुढील २ दिवस बंद ठेवण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. काश्मीरमधील विद्यापीठांच्या परीक्षाही स्थगित करण्यात आल्या आहेत.

सौदी अरेबियाच्या ‘रास तनुरा’ रिफायनरीवर इराणचा भीषण ड्रोन हल्ला; जागतिक तेल पुरवठा धोक्यात, पेट्रोल-डिझेल महागणार?

मोदींकडून सुरक्षा आढावा
पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी रात्री देशाच्या सुरक्षा आणि धोरणात्मक बाबींवरील सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था असलेल्या सुरक्षा मंत्रिमंडळ समितीची बैठक घेतली. सीसीएसने पश्चिम आशियातील ताज्या संघर्षामुळे उद्भवलेल्या परिस्थिती आणि तेथे अडकलेल्या भारतीयांबाबत चर्चा केल्याचे वृत्त आहे, असे वृत्तसंस्था पीटीआयने दिले आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : आजी-माजी लोकप्रतिनिधींना जिल्हा बँकेत पुन्हा संधी!

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar महाराष्ट्रासह संपूर्ण आशिया खंडात नावलौकिक असलेल्या, तसेच नगर जिल्ह्यातील शेतकरी आणि साखर कारखानदारांची आर्थिक कामधेनू मानल्या जाणार्‍या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी...