Monday, May 6, 2024
Homeनगर7 महिन्यांचे मानधन थकल्याने होमगार्ड जवान हवालदिल

7 महिन्यांचे मानधन थकल्याने होमगार्ड जवान हवालदिल

नेवासा |तालुका वार्ताहर| Newasa

कोविड काळात मागील सात महिन्यापासून बंदोबस्तासाठी पोलिसांना मदत केलेल्या गृहरक्षक दलातील (होमगार्ड) जवानांचें मानधन थकले असून त्यामुळे हे जवान हवालदिल झाले आहेत.

- Advertisement -

जानेवारी महिन्यापासून खात्यांवर एक रुपयाही जमा झालेला नाही. त्यातच सध्या लॉकडाऊन काळात कुटूंबाचा उदरनिर्वाह कसा करावा असा प्रश्न होमगार्ड जवानांच्या समोर निर्माण झाला आहे.

फ्रंटलाईन वर्कर (कोविड योद्धे) म्हणून हे जवान कर्तव्य बजावत आहेत. मात्र पाच महिन्यापासून ते मानधनापासून वंचीत असल्याने दबक्या आवाजात नाराजीचा सुर ऐकायला मिळत आहे.

बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलेल्या जवानांचा बंदोबस्त संपताच एका महिन्याचे प्रमाणपत्र स्थानिक पोलीस ठाण्याला देण्याचे बंधनकारक आहे मात्र महिना उलटूनदेखील काही पोलीस ठाण्यातील कंपनी चालक हलगर्जीपणा करतात. यामुळे जवानांच्या खात्यात मानधन वेळेत जमा होत नाही.

करोनासारख्या महामारीत पोलीस यंत्रणेला सर्वात मोठी मदत गृहरक्षक दलाची होत आहे. जिल्ह्यात जवळपास 500 महिला व पुरुष जवान कर्तव्य बजावत आहेत. पोलीस ठाण्यात ड्युटीसाठी हजर झाल्यानंतर कर्तव्य बजावत असताना दैनंदिन जीवनातील पेट्रोल, आहार भत्ता, असा खर्च होत असतो. परिस्थिती प्रमाणे खर्च करून जवान आपले कर्तव्य पार पाडतात आहे तो पैसा खर्च होतो आणि मानधन वेळेत जमा होत नाही.

अप्पर पोलीस अधीक्षक तथा जिल्हा समादेशक सौरभकुमार अग्रवाल यांनी जवानांच्या मानधनाबाबत जातीने लक्ष केंद्रित करावे अशी मागणी होमगार्ड जवान करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या