Sunday, May 19, 2024
Homeजळगावघरकुलधारकांकडे 16 कोटींची थकबाकी

घरकुलधारकांकडे 16 कोटींची थकबाकी

जळगाव । Jalgaon

शहरातील घरकुलधारकांकडे (homeowners) गेल्या 18 ते 20 वर्षापासून थकबाकी आहे. वारंवार थकबाकी भरण्यासाठी आवाहन केल्यानंतरही थकबाकी (Arrears) न भरल्याने आतापर्यंत सुमारे 16 कोटींची थकबाकी (Arrears) आहे. त्यामुळे थकबाकी वसुलीसाठी आता मनपा प्रशासनाच्यावतीने नोटीस (Notice) बजावण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील 4 हजार घरकुलधारकांना उद्या दि.5 पासून नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त प्रशांत पाटील यांनी दिली.

- Advertisement -

तत्कालीन जळगाव नगरपालिकेने शहरातील आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांसाठी आणि जळगाव शहर झोपडपट्टीमुक्त करण्याच्या उद्देशाने घरकुलची योजना राबविली होती. शिवाजीनगर हुडको,गेंदालाल मिल, वाल्मिक नगर, खेडी, पिंप्राळा या ठिकाणी घरकुल बांधण्यात आले आहेत. ते लाभार्थ्यांना हस्तांतरित करण्यात आले. प्रत्येक घरकुलधारकांकडून दररोज 5 रुपये सेवाशुल्क आकारणी केली जाते. मात्र जवळपास 18 ते 20 वर्षापासून बर्‍याच घरकुलधारकांनी सेवाशुल्काची थकबाकी भरलेली नाही. त्यामुळे सेवाशुल्काची थकबाकी 16 कोटी इतकी झाली आहे. त्यामुळे सेवाशुल्काची थकबाकी वसुली करण्याचा निर्णय मनपा प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे उद्या दि. 5 पासून नोटीस बजावण्यात येणार आहे.

थकबाकी न भरल्यास कारवाई

शहरातील 4 हजार घरकुलधारकांना उद्या दि.5 पासून नोटीस बजावण्यात येणार आहे. घरकुलधारकांनी सेवाशुल्काची थकबाकी न भरल्यास कारवाई केली जाणार असल्याचा इशारा मनपा प्रशासनाने दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या