Friday, May 3, 2024
Homeजळगावचाळीसगावात पत्रकारांचा यशोचित सन्मान

चाळीसगावात पत्रकारांचा यशोचित सन्मान

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

तालुक्यातील बेलगंगा साखर कारख्यानचे(अंबाजी) चेअरमन चित्रसेने पाटील यांनी नुकताच दीपावली व राष्ट्रीय पत्रकार दिना निमित्नो चाळीसगावातील पत्रकारांचा मराठ मोल्या पद्धतीने शाल व श्रीफळ देवून सन्मान केला. याप्रसंगी त्यांनी बेलगंगा साखर कारखान सुरु करण्याबाबत देखील अनौपचारीक चर्चा केली, व पुढच्या हंगामात बेलगंगा सुरु होण्याबाबत सांगीतले.

- Advertisement -

बेलगंगा साखर कारखान्याचे चेअरमन चित्रसेन पाटील यांनी चाळीसगाव येथील सर्व पत्रकारांना रविवारी सुट्टीच्या दिवशी आपल्या निवासस्थानी दिवाळी निमित्ताने फराळासाठी व राष्ट्रीय पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी आमंत्रित करुन, सर्व पत्रकराना शाळ व श्रीफळ देवून मराठ मोळ्या पद्धतीने सर्वाचा सत्कार केला.

पत्रकारांना मराठ मोळ्या पद्धतीने केलला सत्कार कुठल्याही सोन्या-चॉंदीच्या भेट वस्तूपेक्षा अधिक भावला. प्रेमाची ऊब देणारी शाल व श्रीफळ देवून पत्रकारांनी वर्षभर केलेल्या कामाची योग्य दखल चित्रसेन पाटील यांनी घेतल्याचे पत्रकारांनी यावेळी बोलून दाखवले.

चित्रसेन पाटील यांच्या पत्नी सौ.मोनिका पाटील यांनी कुठलाही बडेजाव न करता पत्रकारांना आग्रहाने फराळ करण्यास भाग पाडले. याप्रसंगी पत्रकारांनी यंदाच्या वर्षी बंद असलेल्या बेलगंगा साखर कारखान्याबाबत चित्रसेन पाटील यांच्याशी अनौपचारीक चर्चा केली असता, कारखान्याचे दोन बॉयलर व इतर दुरुस्तीसाठी जवळपास १० कोटींचा खर्च लागणार आहे.

परिसरात ऊस उपलब्ध असल्यामुळे यंदाच्या हंगाम चांगला घेता आला असता, परंतू कोरोनाची पार्श्‍वभूमी व आर्थिक अडचण असल्यामुळे कारखाना सुरु करु शकलो नाही. परंतू पुढच्या हंगामात कारखान नक्कीच सुरु करु अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. याप्रसंगी जेष्ठ पत्रकार किसनराव जोर्वेकर, एम.बी.पाटील, संजय सोनार, देवीदास पाटील, मोतीलाल आहिरे, निलेश परदेशी, स्वप्नील वडनेरे, मंगेश शर्मा, मनोहर कांडेकर, आदि चित्रसेन पाटील आदि उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या