Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रवृद्ध कलावंतांना आठ दिवसात मानधन देणार

वृद्ध कलावंतांना आठ दिवसात मानधन देणार

मुंबई । प्रतिनिधी

राज्यातील वृद्ध कलाकार आणि साहित्यिक मानधन योजनेतील सुमारे २८ हजार पात्र मानधनधारकांच्या खात्यात येत्या आठ दिवसात मार्चअखेर पर्यंतचे मानधन जमा होईल, अशी माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी गुरुवारी सांगितले.

- Advertisement -

देशमुख म्हणाले की, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या तीन महिन्यांचे मानधन अदा करण्यात येत आहे. यासाठी १८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून वारसदार आणि नव्याने अंतर्भूत झालेल्या काही कलाकारांनाही मानधन अदा होईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कलाकारांच्या पाठीशी सांस्कृतिक कार्य विभाग नेहमीच राहील.

राज्यातील वृद्ध साहित्यिक आणि कलावंत यांच्यासाठी राज्य सरकारकडून ही योजना १९५५ पासून राबविण्यात येते. अलीकडेच या मानधनात वाढ करण्यात आली असून सद्यस्थितीत श्रेणीनिहाय (अ श्रेणी ३ हजार १५० रुपये, ब श्रेणीसाठी २ हजार ७०० आणि क श्रेणीसाठी २ हजार २५० रुपये ) मानधन दरमहा अदा करण्यात येते.

- Advertisment -

ताज्या बातम्या