Friday, May 3, 2024
Homeनाशिकहोमगार्ड सेवकांनी केली रुग्णालयाची साफसफाई

होमगार्ड सेवकांनी केली रुग्णालयाची साफसफाई

सुरगाणा | प्रतिनिधी Surgana

७६ वा होमागार्ड वर्धापन दिन (76th Homeguard Anniversary )तालुक्यात उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी तालुका समावेश प्रभाकर चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण रुग्णालयाच्या आवाराची साफसफाई करण्यात आली.

- Advertisement -

होमगार्ड वर्धापन दिन या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रात ७ ते १३ डिसेंबर या सप्ताहात स्वच्छता अभियान राबविण्यात येते. वर्धापन दिनानिमित्त गावात रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.अभियानांतर्गत दवाखाना तसेच संपूर्ण परिसर स्वच्छ केला. तदनंतर विमोचन प्रत्याक्षिक सादर करण्यात आले.

सदर प्रसंगी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय सोज्वळ धनगर,परिचारिक राहुल देवाडे,कक्ष सेवक हरी कामडी, सफाई कामगार गुलाब वार्डे,जगदीश चौधरी,शेवंती गायकवाड,मंगला देशमुख, वैशाली ठाकरे,भारती थविल, मनोहर देशमुख,मधुकर धुम, सुरेश आहेर,मधुकर बा-हे, नारायण थविल,गुलाब देशमुख,दिनकर धुम,अविनाश जाधव,लक्ष्मण देशमुख,हरिश्चंद्र धुम,जगदीश पाडवी,भरतराज खंबाईत,बी.चव्हाण,सी.चव्हाण, एस.आहेर व महिला व पुरुष होमगार्ड उपस्थित होते.

सुरगाणा ग्रामीण रुग्णालयाची दुरुस्तीचे काम सुरु असून जुनेच नवे केले जाते आहे.एकीकडे होमगार्ड कर्मचारी यांनी परिसराची सफाई केली. मात्र शवविच्छेदन शेजारील हौदात कित्येक दिवस साचलेले अशुद्ध पाणी असून त्यामध्ये रिकाम्या बाटल्या, झाडांचा पालापाचोळा पडला असून या पाण्यात जंतू पडलेले आढळतात.यामध्ये डासांची पैदास,उत्पत्ती होत असावी.या हौदाची साफसफाई करुन स्वच्छता ठेवल्यास पाणी वापरात येईल.

- Advertisment -

ताज्या बातम्या