Friday, May 3, 2024
Homeनाशिकरुग्णालये व पूरवठादारांनी प्राणवायू पूरवठा व त्यांच्या दराबद्दल करार करावे : सहआयुक्त...

रुग्णालये व पूरवठादारांनी प्राणवायू पूरवठा व त्यांच्या दराबद्दल करार करावे : सहआयुक्त पवार

सातपूर l Satpur (प्रतिनिधी)

करोनाबाधितांमध्ये दिवसागणिक कमालीची वाढ होत असताना या काळात द्रवरूप प्राणवायूचा तुटवडा भासू नये म्हणून सर्व कोरोना रुग्णालयांनी पुरवठाधारकाशी प्राणवायूचे प्रमाण व दर संबंधित करारनामा करावा, अशी सूचना अन्न औषध प्रशासन विभागाच्या सहआयुक्त माधुरी पवार यांनीे केली आहे.

- Advertisement -

अशा करारनाम्यामुळे पुरवठादारावर प्राणवायू पुरविणे बंधनकारक राहील. काही पूरवठाधारक शासकिय रुग्णालयांना कमी आणि खासगी रुग्णालयांना पुरेपूर द्रवरूप पाणीपुरवठा करीत होते. या कार्यपद्धतीने शासकीय रुग्णालये वेठीस धरली जात असल्याची तक्रार केली जात होती. आरोग्य विभागाने वैद्यकीय प्रयोजनासाठी 80 टक्के आणि औद्योगिक प्रयोजनार्थ 20 टक्के प्राणवायूचा पुरवठा करण्याचे निर्देश दिले आहेत.

करोनाच्या दुसर्‍या लाटेत बाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे पुढील काळात मागणीत वाढ होऊ शकते. मागणी-पुरवठ्यात तफावत होऊन तुटवडा भासू नये म्हणून अन्न औषध प्रशासनाने करोना रुग्णांवर उपचार करणारी रुग्णालये आणि प्राणवायूचा पुरवठा करणार्‍यांना करार करण्याचे सूचवले आहे.

यासंदर्भात प्राणवायू पुरवठादारांची बैठकही अन्न व औषध प्रशासनाकडून घेण्यात आली.परवानाधारकांकडून प्राणवायूचा पुरवठा सुरळीत राखण्यासाठी आवश्यक त्या प्रमाणात उत्पादन होणे आवश्यक आहे. यासोबतच ज्या रुग्णालयामध्ये सिलिंडरमधून गळती होणार नाही याचीकाळजी घेण्यासोबतच वरचेवर तपासणी करावी.

रुग्णालयास पुरविलेले सिलिंडर काळ्या रंगाचे तथा औद्योगिक वापराचे नाहीत याची खात्री करणे गरजेचे आहे. पुरवठादार काही अपरिहार्य कारणास्तव सिलिंडर पुरवठा करण्यास असमर्थ ठरल्यास रुग्णालये इतर पुरवठादाराशी कराराचा विचार करू शकतात, याकडे या बैठकीत अन्न औषध प्रशासन विभागाच्या सहआयुक्त माधुरी पवार यांनी लक्ष वेधले.

- Advertisment -

ताज्या बातम्या