Tuesday, March 25, 2025
Homeभविष्यवेधतोडफोड न करता घरातील सर्व वास्तुदोष कसे संपवू शकतो ?

तोडफोड न करता घरातील सर्व वास्तुदोष कसे संपवू शकतो ?

जर तुमच्या घरात वास्तुदोष आहे आणि तो कुठल्याही प्रकारची तोडफोड न करता दूर केला जाऊ शकत नसेल तर एकदा हे उपाय करून पहा आणि जर कही फरक पडत नसेल तर एखाद्या वास्तुशास्त्र तज्ञाशी संपर्क करून समस्याचे समाधान करा.

चला जाणून घेऊया की कशाप्रकारे तोडफोड न करता वास्तुदोष दूर करू शकतो.

दक्षिणमुखी घर : जर तुमच घर दक्षिणमुखी आहे तर घराच्या समोर दारापासून दोन पावलांवर आग्नेय दिशामध्ये कडुलिंबाचे झाड लावू शकता. त्याची तुम्हाला प्रत्येक दिवशी देखभाल करायची आहे.

स्वच्छता आणि सुगंध : घराची नियमित साफसफाई करून चारही बाजूने सुगंधीत वातावरण तयार करण्यासाठी सुगंधाचा उपयोग करा. जिथे अस्वच्छता असते तिथे राहु हा ग्रह अशांत राहतो आणि जिथे दुर्गंधी असते तिथे शुक्र ग्रह अशांत राहतो खासकरुन टॉयलेट आणि बाथरूम स्वच्छ ठेऊन सुगंधीत करणे कधीही योग्य.

हवा आणि प्रकाश येईल असे रस्ते उत्तर आणि ईशान्य दिशेला ठेवा : जर तुमच्या दक्षिण दिशेला खिडकी आहे तर मोठे पडदे लावा, दरवाजा असेल तर कडुलिंबाचे झाड लावून ठेवा. संभव असल्यास उत्तर दिशेला उजेडदान असावं. जर उत्तर आणि ईशान्य दिशेला खिडकी दरवाजे आहेत तर मग काहीच करण्याची गरज नाही. त्यालाच सुंदर बनवून ठेवा.

घराला सुंदर बनवा : घराला सुंदर चित्रे, पडदे या वस्तुंनी सजवा. जसे की फ्लॉवरपॉट, पेंटिंग, फुले, पारंपरिक चित्रे, झुंबर, लटकन इत्यादी वस्तूंनी सजवून ठेवा.

दरवाजा सुंदर आणि मजबूत बनवा : घराच्या मुख्य दाराची चौकट आणि उंबरठा याला मजबूत लाकडाने बनवा आणि त्याला सुंदर बनवा त्यावर नमस्कार असे चित्र लावा. तसेच त्यावर शुभ लाभ, याची चित्रे लावा. उंबरठ्याच्या दोन्ही बाजुला स्वस्तिक बनवा. आजूबाजूला सुंदर फुलांच्या कुंड्या ठेवा. आणि दरवाजाची नियमित साफसफाई करा.

नळातून पाणी टपकणे : घरात जेव्हा नळातून पाणी टपकते तेव्हा ते अशुभ मानले जाते. नळ टपकणे नकारात्मकतेला जन्म देते आणि आर्थिक नुकसान सोबत आरोग्य संबंधी समस्या निर्माण होतात. जर भिंतीत कुठे पाणी मुरत असेल तर ते लगेच ठीक करा. नळातून पाणी टपकणे आर्थिक संकटांचे संकेत असतात. टपकणार्‍या नळाला लवकरात लवकर दुरुस्त करावे. जर घरात कुठल्यापण भांड्यातून पाणी गळत असेल तर ते पण दुरुस्त करावे तसेच छतावर ठेवलेल्या पाण्याच्या टाकीतून पाणी गळत असेल तर ते देखील दुरुस्त करावे.

खोल्यांचे रंग : प्रवेश कक्ष म्हणजे दरवाजातून आत आल्यावर जी खोली सगळ्यात आधी येते, तिथे पांढरा, हलका हिरवा, गुलाबी किंवा निळा रंग देणे शुभ परिणाम देतं. बैठकीच्या खोलीत नेहमी पिवळा, धूसर, भूरा, हिरवा रंग शुभ असतो.

  • जेवण्याच्या खोलीत तुम्ही हिरवा, निळा, हलका गुलाबी किंवा इतर हलका रंग लावू शकता. हे रंग या खोलीसाठी शुभ असतात.
  • मुख्य शयन कक्षात हिरवा, निळा, गुलाबी हल्का रंग लावायला पाहिजे. जो वास्तूच्या अनुसार त्या खोलीसाठी शुभ फल प्रदान करतात.
  • लहान मुलांची खोली असेल किंवा जिथे लहान मुले झोपतात तिथल्या भिंतीला निळा, हिरवा रंग शुभ असतो.
  • स्वयंपाकघरामध्ये नेहमी शांतीदायक पांढरा रंग शुभ असतो. जो तिथल्या उर्जेला सकारात्मकता प्रदान करतो. * देवघरात सदैव गुलाबी, हिरवा, लाल रंग लावणे हे शुभ फल प्रदान करते. बाथरूमच्या आतील रंग गुलाबी, काळा, स्लेटी किंवा पांढरा असेल तर तो शुभ सकारात्मक फल प्रदान करतो.
  • अध्ययन कक्ष किंवा अभ्यास खोली तिथे हिरवा लाल, गुलाबी, हलका निळा रंग शुभ असतो.
    इतर महत्वाचे उपाये : घरात विशेषज्ञला विचारुन पूजा घर बनवा. आणि कुठल्या देवी देवताची एकापेक्षा जास्त मूर्ती ठेवू नये.
  • घरात कुठेही कोळीचे जाळे तयार होऊ देऊ नका.
  • घरात कधीच कचरा जमा होऊ देऊ नका.
  • गच्चीवर कुठल्याही प्रकारची अनुपयोगी वस्तु ठेवू नका.
  • कधीच ब्रहमुहूर्त आणि संध्याकाळी झाडू लावू नये. झाडू अशा ठिकाणी ठेवा की तिथे बाहेरून आलेल्या व्यक्तीची नजर पडणार नाही.
  • घराला स्वच्छ आणि सुंदर ठेवा. घराचे चारही कोपरे स्वच्छ ठेवा. खासकरुन ईशान्य उत्तर वायव्य कोपरे रिकामे आणि स्वच्छ ठेवा.
  • बाथरूमला सतत ओले ठेवल्यास आर्थिक स्थितीला धोकादायक आहे. काम झाल्यानंतर त्याला कपड्याने पुसून वाळवण्याचे प्रयत्न करावेत.
  • दक्षिण आणि पश्चिम दिशा रिकामी ठेवणे हे करियरच्या स्थिरतेसाठी चांगले नसते. यासाठी या दिशेला रिकामे ठेवू नका.
  • घरात काळा, वांगी कलरचा उपयोग वापर करू नका. मग चादर, पडदे, भिंतींचा रंग असो.
  • घरात फरशी, भिंती, छताला भेगा पडलेल्या नसाव्या. असे असल्यास लगेच भरून काढा.
  • बेड समोर आरसा कधीच लावू नये. झोपण्याच्या खोलीत धार्मिक चित्रे लावू नये. बेडरूममध्ये लाल रंगाचा बल्ब लावू नये. निळ्या रंगाचा बल्ब चालेल. खराब गाद्या, तक्के, पडदे, चादर, चटई ठेवू नये. या खोलीत तुटका पलंग ठेवू नये. पलंगचा आकार बहुदा चौकोनी पाहिजे. पलंग हा छताला बीम असतो त्याखाली ठेवू नका. * बेडरुमच्या दरवाजासमोर पलंग ठेवू नका. लाकडी पलंग असेल तर अधिकच छान.
  • बेडरूममध्ये चपला, इलेक्ट्रॉनिक्स आयटम्स, तुटके आवाज करणारे पंखे, तुटलेल्या वस्तू, फाटलेले जुने कपडे, प्लास्टिक वस्तू ठेवू नये.
  • बाथरूममध्ये निळ्या रंगाची बादली ठेवा आणि आंघोळीला लाकडी किंवा दगडी पाट ठेवा.
  • बाथरूममध्ये कुठल्याही प्रकारचे चित्र लावू नये. तर उचित दिशेला आरसा जरूर लावावा.
  • बाथरूममध्ये मनीप्लांट लावणे शुभ असते बाथरूममध्ये वास्तु दोष दूर करण्यासाठी निळ्या रंगाचा मग आणि बादलीचा उपयोग करणे.
  • घराच्या जवळ केळी, तुळस, मनीप्लांट, डाळिंब, पिंपळ, वड, आंबा, नारळ, जांभूळ, पेरू यांसारखी झाडे लावले पाहिजे.
  • नेहमी दार आणि उंबरठा यांची पूजा करावी व साफसफाई करावी. प्रत्येक खोलीसाठी वेगवेगळ्या रंगाचे कार्पेट आणावे व ते टाकून त्याची स्वच्छता ठेवावी. घराबाहेर दाराजवळ नेहमी रांगोळी काढावी.
  • घराच्या बाहेर आणि आत वरती गणपतीचे चित्र लावायला पाहिजे. दरवाजाच्या डाव्या आणि उजव्या बाजूला नमस्कार असलेले चित्र लावावे.
  • दरवाजाचा उंबरठा चांगला आणि मजबूत असावा ज्याच्या आजूबाजूला स्वस्तिक बनलेले हवे. दरवाजाच्या बाहेर आपले गुरु किंवा अन्य देवी देवतांचे चित्र लावू नये.
  • स्वयंपाक घरात पितळ, कांस्य, तांबा, चांदीच्या भांड्यांचा उपयोग करावा.
  • आपल्या खिडकीला पडद्ये लावावेत. खिडकीच्या आजूबाजूला छान चित्रे लावावी.
  • घरात अतिथि कक्षात हंसाचे मोठे चित्र लावावे. ज्याने खुप सारी समृद्धी आणि धन येईल. याशिवाय कुठे एखाद्या कोपर्‍यामध्ये धनाने भरलेले पात्र असे चित्र लावू शकतो.
  • गृहकलह आणि वैचारिक मतभेद यापासून वाचण्यासाठी हसणार्‍या संयुक्त परिवाराचे चित्र लावावे. जर तुम्हाला दुसर्‍यांचे चित्र लावायची नसतील तर स्वत:च्या परिवरातील सदस्यांचे प्रसन्न चित्रे दक्षिण-पश्चिम दिशेच्या कोपर्‍यात लावावे.
  • समुद्राच्या किनारी सात घोडे असलेले चित्रे लावण्यासाठी पूर्व दिशा शुभ मानलेली आहे. हे चित्रे एखाद्या वास्तुशास्त्र तज्ञाला विचारुनच लावावे.
  • घोड्यांची चित्रे लावायची नसतील तर पोहणार्‍या माश्याची चित्रे लावू शकता. अतिथि कक्षात घराच्या मुख्य व्यक्ती बसत असेल त्यामागे पर्वत किंवा उडणार्‍या पक्ष्याचे चित्र लावावे. अशी चित्रे बघितली की आत्मविश्वास आणि मनोबल वाढते.
  • स्वयंपाक घरात भिंतीला सुंदर फळांची आणि भाज्यांची चित्रे लावावी. अन्नपूर्णा देवीचे चित्र लावल्यास बरकत राहते.
  • ज्या घरात स्वयंपाक घर दक्षिण-पूर्व म्हणजे आग्नेय कोपर्‍यात नसेल तर वास्तुदोषला दूर करण्यासाठी स्वयंपाक घराच्या उत्तर-पूर्व ईशान्य कोपर्‍यात सिंदूरी गणपतीची चित्रे लावावी. जर तुमचे स्वयंपाक घर आग्नेय कोपर्‍यात नसून वेगळ्या दिशेला बनलेलेे असेल तर तिथे यज्ञ करत असलेल्या ऋषींचे चित्र लावावे.
  • जर मुलांचे मन अभ्यासात लागत नसेल तर अभ्यास खोलीत सरस्वती, वेदव्यास, पक्षी यांची चित्रे लावावी. तसेच मोर, वीणा, पेन, पुस्तक, हंस, मासा चित्रे लावू शकतात. वरील कुठलेही एक प्रकारचे चित्र लावावे.
  • बेडरूम आग्नेय कोपर्‍यात असेल तर पूर्व मध्य भिंतीवर शांत समुद्राचे चित्र लावावे.
YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...