Thursday, January 29, 2026
Homeब्रेकिंग न्यूजAjit Pawar Death: अजितचे विमान कसे, कुठे कोसळले? बारामतीत पोहोचताच शरद पवारांनी...

Ajit Pawar Death: अजितचे विमान कसे, कुठे कोसळले? बारामतीत पोहोचताच शरद पवारांनी घेतली माहिती

बारामती | Baramati
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज सकाळी पावणे नऊ वाजताच्या सुमारास बारामतीत विमान अपघातात निधन झाले. या घटनेने राज्यावर शोककळा पसरली असून नेते, कार्यकर्ते धक्क्यात आहेत. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवार बारामतीमध्ये येत असताना अजित पवारांचा हा अपघाती मृत्यू झाला. यावेळी नवी दिल्लीत असलेल्या शरद पवारांनी थेट बारामती गाठली आणि हेलिकॉप्टरमधून उतरताच हा अपघात कसा झाला याची माहिती घेतली.

शरद पवार बारामती विमानतळावर पोहोचताच त्यांनी तिथे उपस्थित असलेल्या लोकांकडून माहिती घेतली. अजितचे विमान कसे आणि कुठे कोसळले असा प्रश्न त्यांनी विचारला. त्यावर रन वे ज्या ठिकाणी संपतो त्याच्या आधी एक किमी विमानाचा अपघात झाला. त्या ठिकाणी असलेल्या बाजूच्या खोलगट भागात हा अपघात झाल्याची माहिती शरद पवारांना देण्यात आले.

- Advertisement -

Ajit Pawar: ज्या विमानात अजित पवार बारामतीला निघाले होते, त्या VSR कंपनीची माहिती आली समोर

YouTube video player

शरद पवार यावेळी काहीसे भावुक झाल्याचे दिसून आले. अजित पवारांच्या अकाली जाण्यामुळे पवार कुटुंबीयांचे न भरणारी हानी झाल्याचे म्हटले जातेय.

ताज्या बातम्या