Sunday, February 8, 2026
HomeनगरShrirampur : बारावीला 3818 तर दहावीसाठी 4 हजार 726 विद्यार्थी होणार प्रविष्ठ

Shrirampur : बारावीला 3818 तर दहावीसाठी 4 हजार 726 विद्यार्थी होणार प्रविष्ठ

परीक्षेसाठी भरारी पथके || प्रत्येक केंद्रावर ‘सीसीटीव्ही’ची राहणार नजर

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणार्‍या इयत्ता 12 वीच्या परीक्षेसाठी श्रीरामपूर तालुक्यातील 6 परीक्षा केंद्रावर 3 हजार 818 तर इयत्ता 10 वीच्या परीक्षेसाठी 11 केंद्रावर 4 हजार 726 विद्यार्थी प्रविष्ठ होणार आहे. या परीक्षेचे संपूर्ण नियंत्रण क.जे. सोमय्या हायस्कूल येथून केले जाणार आहे. परीक्षा कॉफीमुक्त व पारदर्शक वातावरणात पार पडण्यासाठी शिक्षण विभाग सतर्क असून भरारी पथकही राहणार आहे.

- Advertisement -

इयत्ता 12 वीच्या परीक्षेस दि. 10 फेब्रुवारी 2026 पासून सुरुवात होणार आहे. बारावीच्या परीक्षेसाठी तालुक्यातील रा.ब. नारायणराव बोरावके कॉलेज श्रीरामपूर, (1452 विद्यार्थी), बी.आर. खटोड कन्या विद्यालय श्रीरामपूर (383 विद्यार्थी), जे.टी.एस. सोमय्या हायस्कूल अ‍ॅण्ड ज्यु. कॉलेज बेलापूर, (468 विद्यार्थी), आर्ट्स कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेज, अशोकनगर (510 विद्यार्थी), सी.डी.जैन कॉलेज, श्रीरामपूर(713) व अशोक इंग्लिश मिडियम स्कूल, शिरसगाव (292 विद्यार्थी) अशा 6 परीक्षा केंद्रावर एकूण 3 हजार 818 विद्यार्थी प्रविष्ठ होणार आहे.

YouTube video player

तर इयत्ता 10 वीच्या परीक्षेस दि. 20 फेब्रुवारी 2026 पासून सुरुवात होणार आहे. इयत्ता दहावीसाठी तालुक्यातील के.एस.जे. पाटणी विद्यालय, श्रीरामपूर (528 विद्यार्थी), करमशी जे सोमैय्या हायस्कूल, श्रीरामपूर ( 850 विद्यार्थी), भास्करराव गलांडे पाटील विद्यालय, अशोकनगर (424 विद्यार्थी), भास्करराव गलांडे पाटील विद्यालय, उंदिरगाव (244 विद्यार्थी), न्यू इंग्लिश स्कूल टाकळीभान (349 विद्यार्थी), जे.टी.एस. सोमैय्या हायस्कूल, बेलापूर (675 विद्यार्थी), न्यू इंग्लिश स्कूल कोल्हार (ता.राहाता, 476 विद्यार्थी), न्यू इंग्लिश स्कूल, शिरसगाव (395 विद्यार्थी), संत तेरेजा बॉईज हायस्कूल, हरेगाव (193 विद्यार्थी), डी.डी. काचोळे माध्यमिक विद्यालय, श्रीरामपूर (345 विद्यार्थी), सद्गुरु गंगागिरी विद्यालय, नाऊर (247 विद्यार्थी) याप्रमाणे 11 परीक्षा केंद्रावर एकूण 4 हजार 726 विद्यार्थी प्रविष्ठ होणार आहेत.

दरम्यान, शिक्षण विभागाकडून प्रत्येक परीक्षा केंद्रावर केंद्र संचालक नियुक्त केले आहे. परीक्षा कॉफीमुक्त व पारदर्शक पार पाडण्यासाठी शिक्षण विभागाकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे असून भरारी पथकाचीही नेमणूक करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

Crime News : मोबाईल शॉपीतील वादातून दोन गटात राडा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar शहराच्या स्टेशन रोड परिसरात असलेल्या एका मोबाईल शॉपीमध्ये मोबाईल खरेदीच्या व्यवहारातून वाद निर्माण होऊन त्याचे रूपांतर विनयभंग व हाणामारीत झाल्याची घटना शुक्रवारी...