पुणे | वृत्तसंस्था | Pune
इयत्ता बारावीच्या (HSC) फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये झालेल्या परीक्षेचा (Results) निकाल महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ उद्या (दि.५) जाहीर करणार आहे. मंडळाने याबाबत आज अधिकृत घोषणा केली. निकाल जाहीर होणार असल्याने लाखो विद्यार्थी (Student) आणि त्यांच्या पालकांची धाकधूक वाढली आहे. विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल उद्या दुपारी १ वाजेपासून ऑनलाईन पाहता येणार आहे.
यंदा बारावीची परीक्षा दरवर्षीपेक्षा १० दिवस लवकर घेण्यात आली. ११ फेब्रुवारी ते ११ मार्च या कालावधीत ही परीक्षा सुरळीत पार पडली. राज्यभरातून १५ लाख विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. आता परीक्षा मंडळाने (Examination Board) निकालासाठी अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार मंडळाने निकालाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. उद्या निर्धारित वेळेत विद्यार्थ्यांना परीक्षा निकाल उपलब्ध करून दिला जाणार आहे.
दरम्यान, निकाल जाहीर होण्यापूर्वी, उद्या सकाळी ११ वाजता मंडळाची पत्रकार परिषद होणार आहे. यावेळी संपूर्ण महाराष्ट्राचा बारावीचा निकाल, तसेच विविध विभागांनुसार निकालाची आकडेवारी आणि वैशिष्ट्ये जाहीर केली जातील. त्यानंतर, दुपारी १ वाजेपासून विद्यार्थी त्यांचा वैयक्तिक निकाल ऑनलाईन पाहू शकतील. विद्याव्याँना त्यांचा निकाल मंडळाच्या विविध अधिकृत संकेतस्थळांवर पाहता येणार आहे. त्यात प्रामुख्याने mahresult.nic.in या संकेतस्थळाचा समावेश आहे.
येथे निकाल पाहता येणार
mahahsscboard.in
mahresult.nic.in
hscresult.mkcl.org
msbshse.co.in
mh-ssc.ac.in
sscboardpune.in
sscresult.mkcl.org
hsc.mahresults.org.in
निकाल कसा पाहायचा?
* सर्वांत आधी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर जा.
* होमपेजवर ङ्गमहाराष्ट्र एसएससी / एचएससी निकाल २०२५फलिंक दिसेल. त्यावर क्लिक करा.
* क्लिक करताच नवीन विंडो उघडेल, त्या ठिकाणी तुमचा सीट क्रमांक टाका. सोबत आईचे नाव भरुन सबमिट बटनावर क्लिक करा.
* त्यानंतर तुम्हाला तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल. निकालाची प्रत डाऊनलोडही करता येईल.