Sunday, October 18, 2026
Homeजळगावमाणुसकी अन् गावाचा विकास हाच माझा धर्म-गुलाबराव पाटील

माणुसकी अन् गावाचा विकास हाच माझा धर्म-गुलाबराव पाटील

जळगाव । प्रतिनिधी
जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील शिवसेना महायुतीचे उमेदवार मंत्री गुलाबराव पाटील यांनी ‘हवा में उडने वाले जमी पर नही टिकते, जनता उन्हे पसंद करती हैं जो काम में दिखते’ अशी शेरोशायरी करून भाषणाला सुरुवात केली. धरणगाव येथील कोट चौकात व पाळधी येथील झालेल्या या सभेत गुलाबराव यांनी जोरदार फटकेबाजी केली.

धरणगाव शहरातील 73 कोटीची पाणीपुरवठा योजना सुरू करून धरणगाव वासियांना पाणी पाजत आहे. पाणी पुरवठा सुरुळीत होऊ नये यासाठी अडथळा आणणारी मंडळी कोण आहे? हे तुम्हाला देखील माहित आहे. एकनाथ शिंदे हे प्रत्येक महिन्याला आपल्या बहिणींना भाऊबीज देत आहे. आता पंधराशे वरून एकवीसशे रुपये देणारआहे. माझ्या लाडक्या बहिणींचा पाठींबा आणि कार्यकर्त्यांच्या कष्टांबरोबरच जनतेच्या आशीर्वादाने भाऊबीजची परतफेड म्हणून तुम्ही बहिणीच मला विजयी करतील असा विश्वास जळगाव ग्रामीण मतदार संघातील महायुतीचे उमेदवार गुलाबराव पाटील यांनी धरणगाव व पाळधी येथील जाहीर सभेत व्यक्त केला.

ताज्या बातम्या

कोलकाता शहरात दुर्गापूजेदरम्यान चेंगराचेंगरी; १७ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

0
कोलकाता पश्चिम बंगालमधील कोलकाता शहरात दुर्गापूजेच्या उत्सवादरम्यान शनिवारी (१७ ऑक्टोबर) मोठी दुर्घटना घडली. उत्तर कोलकात्यातील चोरबागान सार्वजनिक दुर्गापूजा मंडपात झालेल्या चेंगराचेंगरीत किमान १७ जणांचा...