Saturday, May 3, 2025
Homeनगरधक्कादायक ! दोन मुलांच्या आत्महत्यानंतर पती-पत्नीने ही संपवले जीवन

धक्कादायक ! दोन मुलांच्या आत्महत्यानंतर पती-पत्नीने ही संपवले जीवन

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

शहरातील वाडेकर गल्लीत राहणार्‍या पती-पत्नीने गळफास (Husband and Wife Suicide) घेत मंगळवारी (दि. 3 सप्टेंबर) दुपारी आपली जीवनयात्रा संपवली आहे. दोन वर्षांपूर्वी मयत पती-पत्नीच्या अवघ्या सोळावर्षीय मुलाने देखील घरातच तर पाच दिवसांपूर्वी 21 वर्षीय मोठ्या मुलाने पुण्यात गळफास घेत आत्महत्या (Child Death) केली होती. त्यानंतर या दोघांच्या जन्मदात्यांनीही आत्महत्या केली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.

- Advertisement -

याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीवरुन, संगमनेर नगरपालिकेत (Sangamner Municipality) लिपीक पदावर सेवेत असलेले मात्र काही महिन्यांपूर्वी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारणारे गणेश वाडेकर व घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात परिचारिका म्हणून कार्यरत असलेल्या गौरी वाडेकर यांनी आपल्या राहत्या घरात छताला गळफास बांधून जीवन संपवले. पाच दिवसांपूर्वी पुण्यात (Pune) शिक्षण घेणारा त्यांचा मोठा मुलगा श्रीराज गणेश वाडेकर यानेही आपल्या खोलीत गळफास घेतला होता.

तर दोन वर्षांपूर्वी त्यांचा छोटा मुलगा श्रेयस यानेही वाडेकर गल्लीतील आपल्या घरातच गळफास घेत आत्महत्या (Suicide) केली होती. त्यातच मंगळवारी दुपारी सव्वा चारच्या सुमारास घडलेल्या आईवडीलांनी देखील आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेचा शहर पोलीस (Sangamner Police) अधिक तपास करत आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Crime : लाखो रुपयांच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला

0
नाशिक | प्रतिनिधी Nashik दरवाजा तोडून चोरट्यांनी एका घरातील कपाटातून सुमारे 11 तोळे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना आनंदवली, नवश्या गणपती परिसरात घडली. यात सुमारे...