श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda
श्रीगोंदा (Shrigonda) तालुक्यातील पेडगाव (Pedgav) येथे तरुणाने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पत्नीला लाकडी दांडक्याने मारहाण (Beating) करत हत्या (Murder) केल्याची घटना शनिवारी (दि. 18) रात्री उशीरा घडली. भांडण सोडविण्याचा प्रयत्न करणार्या स्वत:च्या आईलाही करण दिवटे याने बेदम मारहाण केली. प्रियंका करण दिवटे (वय 22) असे मारहाणीत मयत झालेल्या तरुणीचे नाव आहे. तर आशा नवनाथ दिवटे (वय 45) ही महिला जखमी झाली. घटनेनंतर आरोपी पती हा स्वतः हून रविवारी (दि. 19) पोलीस ठाण्यात हजर झाला असून या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
पेडगाव (Pedgav) येथील दिवटे वस्तीवर राहणार्या करण दिवटे यानेे शनिवारी पत्नी प्रियंकाशी वाद केला. वाद विकोपाला गेल्याने आरोपी करण याने पत्नीला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण सुरू केली. मारहाण (Beating) सुरू असताना करण याच्या आईने यात मध्यस्थी करत भांडण मिटविण्याचा प्रयत्न केला असता करण याने आईला देखील बेदम मारहाण केली. या मारहाणीत करणच्या आई आशा नवनाथ दिवटे यांच्या पायाला दुखापत झाली. तर मारहाणीत गंभीर जखमी होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने प्रियंकाचा मृत्यू (Death) झाला. उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे व श्रीगोंद्याचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास पोलीस निरीक्षक किरण शिंदे करत आहेत.