Saturday, November 7, 2026
Homeब्रेकिंग न्यूजचारित्र्याचा संशय घेत पत्नीचा खून; पतीस जन्मठेपेची शिक्षा

चारित्र्याचा संशय घेत पत्नीचा खून; पतीस जन्मठेपेची शिक्षा

मालेगाव | प्रतिनिधी Malegaon

- Advertisement -

पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेत तिचा कुर्‍हाडीने निर्घृण खून करणार्‍या बागलाण तालुक्यातील लोहणेर येथील एकास जन्मठेपेची शिक्षा येथील न्यायालयाने ठोठावली. अप्पर सत्र न्यायालयाचे न्यायमुर्ती एम.ए. भोसले यांनी हा निकाल दिला.

दि. २ मार्च २०२१ रोजी लोहणेर येथे हा प्रकार घडला होता. हिरामण काळू वाघ (४५) हा आपल्या पत्नीच्या चारित्र्याचा सतत संशय घेत तिला मारहाण करीत होता. त्याने २ मार्च २०२१ रोजी दुपारी १ च्या सुमारास यावरून पुन्हां वाद घातला. या वादातून त्याने तिच्या डोक्यावर कुर्‍हाडीने वार करीत तिला गंभीर जखमी केले. यात अती रक्तस्त्राव झाल्याने तिचा मृत्यू झाला. हा प्रकार त्याचा मुलगा अजय हिरामण वाघ याने प्रत्यक्ष पाहिला होता. या प्रकरणी संजय गोविंदा पवार (रा. लोहणेर) यांनी सटाणा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी हिरामण वाघ विरूध्द खुनाचा गुन्हा दाखल केला होता.

या गुन्ह्याचा तपास सटाणा पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे यांनी करून हा खटला मालेगाव येथील अप्पर सत्र न्यायालयात सुनावणीसाठी सादर केला होता. या खटल्याची सुनावणी न्यायमुर्ती भोसले यांच्यासमोर झाली. सुनावणी दरम्यान अजय वाघ याचेसह ९ जणांच्या महत्वपुर्ण साक्ष झाल्या. न्यायालयासमोर आलेला पुरावा व साक्षीदारांच्या साक्षनुसार हिरामण याने खुन केल्याचे शाबीत झाले. त्याला जन्मठेपेची तसेच पाच हजार रूपये दंडाची शिक्षा न्यायालयाने ठोठावली. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. संजय सोनवणे व अ‍ॅड. अशोक पगारे यांनी काम पाहिले.

ताज्या बातम्या

मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्ते योजनेअंतर्गत ११६ कोटी रुपयांचा निधी वितरित...

0
मुंबई / प्रतिनिधी Mumbai मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्ते योजनेअंतर्गत झालेल्या कामांसाठी राज्य रोहयोचे पूरक कुशल अनुदान म्हणून ११६ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आल्याची...