Friday, May 3, 2024
Homeजळगावप्रेयसीला भेटायला आला अन् ...

प्रेयसीला भेटायला आला अन् …

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

प्रेयसीला भेटण्यासाठी (meet the beloved) जळगाव जिल्ह्यात अमळनेरात आलेल्या सराईत गुन्हेगाराच्या (Criminal) सोमवारी पहाटे स्थानिक गुन्हे शाखेने (Local Crime Branch) मुसक्या आवळल्या आहेत. कैलास आधार पाटील (Kailas Aadhar Patil) रा. महादेव नगर, सोसायटी, नगम, डिंडोली सुरत असे अटक (Arrested) केलेल्या संशयिताचे नाव असून मंगरुळ-पारोळा रोडवरुन त्याला अटक करण्यात आली आहे.

- Advertisement -

गुजरात राज्यात सुरत येथील डिंडोली येथील पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात फरार असलेला संशयित कैलास पाटील हा जळगाव जिल्ह्यात लपून असलेला असल्याची माहिती सुरत येथील पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन गृपला मिळाली. याबाबत सुरत पोलिसांनी पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे यांची भेट घेतली होती. तसेच आरोपीतास अटक करण्यासाठी मदत मागितली होती. याबाबत प्रविण मुंढे यांनी पोलीस निरिक्षक किरणकुमार बकाले यांना सुचना तसेच मार्गदर्शन केले. बकाले यांनी सहाय्यक फौजार अशोक महाजन, संदीप पाटील, प्रविण मांडोळे, भगवान पाटील, नंदलाल पाटील, सचिन महाजन, ईश्वर पाटील यांचे पथक नियुक्त केले.

सापळा रचून केले जेरबंद

संशयित कैलास हा पारोळा तालुक्यातील मंगरुळ येथील जंगलात लपला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने लक्ष केंद्रीत केले. सोमवारी पहाटेच्या वेळी संशयित कैलास हा त्याच्या अमळनेरातील प्रेयसीला भेटायला जाणार असल्याची पक्की खबर पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने मंगरुळ- पारोळा रोडवर सापळा रचून संशयित कैलास पाटील यास जेरबंद केले. त्याला पुढील कारवाईकरीता सुरत शहर स्पेशन ऑपरेशन गृपच्या ताब्यात देण्यात आले आहे. कैलास हा अट्टल गुन्हेगार असून त्याच्यावर गुजरात राज्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये चोरी, 3 खून हाणामारीसह विविध असे एकूण 10 गुन्हे दाखल आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या