Thursday, May 2, 2024
Homeनंदुरबार‘मला मोफतचे रेशन नको’

‘मला मोफतचे रेशन नको’

शहादा | ता.प्र.- SHAHADA

तालुक्यातील खेडदिगर येथील युवक राजू सोमा शिंदे (Raju Soma Shinde) याने ‘मला मोफतचे रेशन नको’ (free rations’) असे निवेदन शहादा तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी (Tehsildar Dr. Milind Kulkarni) यांना देऊन प्रधानमंत्री जनकल्याण योजनेचा (Pradhan Mantri Janakalyan Yojana) माझा पुरवठा थांबवावा अशी मागणी केली आहे.

- Advertisement -

निवेदनात म्हटले आहे, प्रधान मंत्री यांनी गरीब जनतेसाठी कोरोनाच्या काळात प्रधानमंत्री जनकल्याण योजनेच्या (Pradhan Mantri Janakalyan Yojana) माध्यमातून मोफत धान्य वितरण (free rations) सुरू केले. ते आजपर्यंत सुरू आहे. याचा लाभ मीही घेतला.

परंतु आता मी काम, कष्ट करून माझ्या परिवाराचा उदरनिर्वाह करू शकतो, या मोफतच्या धान्याने मिळतंय म्हणून माझ्यातील आळस जागी होतोय म्हणून मला या पुढे प्रधानमंत्री जनकल्याण योजनेचे मोफतचे धान्य नको (I don’t want)

शासनाच्या रेशन दुकानामार्फत (Ration shop) विकत वितरीत करण्यात येणारे धान्य मी शासन दराप्रमाणे खरेदी करून घेईल माझ्या या मोफत च्या धान्य सोडल्याने कुणा गरीबास ते मिळू शकेल. एक सुजाण नागरिक म्हणून मोफत धान्य घेणे हे काही योग्य वाटत नाही. माझ्या गरीब कल्याण योजनेचा कोटा थांबवावा, अशी मागणी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या