Sunday, May 19, 2024
Homeजळगावपहिले गाणे गायल्यावर मिळाले होते 25 रुपये

पहिले गाणे गायल्यावर मिळाले होते 25 रुपये

स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर. भारतीय चित्रपटसृष्टीतील पार्श्वगायनाच्या इतिहासातील एक सुवर्णपान. 28 सप्टेंबर 1929 रोजी मध्य प्रदेश च्या इंदूर शहरात शीख मोहल्ला येथे एका महाराष्ट्रीय गोमंतक कुटुंबात त्यांचा झाला होता. त्यांचे वडील पंडित दीनानाथ मंगेशकर हे शास्त्रीय गायक तसेच नाट्यकलावंत होते.

लता या आपल्या आई-वडिलांचे सर्वात ज्येष्ठ अपत्य. आशा, उषा, मीना आणि हृदयनाथ ही त्यांची लहान भावंडे. लता दीदींना पहिले संगीताचे धडे आपल्या वडिलांकडूनच मिळाले होते. वयाच्या पाचव्या वर्षी त्यांनी वडिलांच्या संगीत नाटकांमध्ये बाल-कलाकार म्हणून कामाची सुरुवात केली.

पहिले गाणे गायल्यावर मिळाले होते 25 रुपये लता यांना पहिल्यांदा स्टेजवर गाणे गाण्यासाठी 25 रुपये मिळाले होते. याला त्या पहिली कमाई मानत असे. लताजी यांनी पहिल्यांदाच 1942मध्ये मराठी सिनेमा पहिली मंगळागौरसाठी गाणे गायले होते. लता यांचे बंधू हृदयनाथ मंगेशकर आणि बहीण उषा मंगेशकर, मीना मंगेशकर आणि आशा भोसले यांनी सर्वांनी संगीत क्षेत्राचीच निवड केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या