Friday, May 3, 2024
Homeराजकीयराहुल गांधींनी साधला पंतप्रधान मोदींवर निशाणा, म्हणाले…

राहुल गांधींनी साधला पंतप्रधान मोदींवर निशाणा, म्हणाले…

दिल्ली l Delhi

तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर राजकीय पक्षांनी आपली कंबर कसली आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी ३ दिवस तामिळनाडूच्या दौऱ्यावर आहेत. आज तामिळनाडूच्या इरोड येथे रोड शो दरम्यान उपस्थित लोकांना संबोधित करताना राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

- Advertisement -

राहुल गांधी बोलतांना म्हणाले की, मी ‘मन की बात’ करायला आलेलो नाही. तुम्हांला काय करायचे आहे, ते सांगायलाही आपण आलेलो नाही. तुमच्या समस्या जाणून घेत, त्या सोडवण्याचा प्रयत्न करण्यासाठी आपण आल्याचे राहुल यांनी सांगितले. तसेच, ‘मन की बात’ करून काहीही साध्य होत नाही. त्यामुळे तुमच्या अडचणी समजून घेत त्या सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे राहुल यांनी सांगितले. जनतेला फक्त उपदेश करून असे करा, तसे करा, हे करा, ते करा असा सल्ला देण्यासही आपण आलेलो नाही. तुमच्या समस्या जाणून त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगत राहुल गांधी यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधला आहे.

याआधी राहुल गांधी यांनी ट्विट करत मोदी सरकारवर महागाईवरून टीकेची झोड उठवली. मोदी यांनी जीडीपीमध्ये जबरदस्त विकास करून दाखवला आहे. मोदी सरकारचा जीडीपी विकास म्हणजे गॅस, डिझेल आणि पेट्रोलच्या किमतीत प्रचंड वाढ असा आहे. या तिघांच्या किमतीत प्रचंड वाढ करत त्यांनी जीडीपी विकास साधला आहे, अशी टीका राहुल यांनी केली. ‘जनता महंगाई से त्रस्त, मोदी सरकार टैक्स वसूली में मस्त’, असे ट्विटही त्यांनी केले होते. इंधन दरवाढीच्या मुद्दावर त्यांनी सरकारला घेरले होते.

यावर्षी एप्रिल मे महिन्यात तामिळनाडूसह आणखी ५ राज्यात विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. त्या पार्श्वभुमीवर काँग्रेसने आपली कंबर कसली आहे. भाजप देखील विधानसभा निवडणुकासाठी मोठ्या ताकदीने मैदानात उतरली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या