Tuesday, May 7, 2024
Homeमहाराष्ट्रमला तर देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री व्हावेत असं वाटतंय - गिरीश बापट

मला तर देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री व्हावेत असं वाटतंय – गिरीश बापट

मुंबई –

जयंत पाटील यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे, हे मी तुमच्या माध्यमातूनच ऐकत आहे. मुख्यमंत्रीपदाबाबत जयंतराव आणि मुख्यमंत्र्यांनीच

- Advertisement -

ठरवायचे आहे, मला तर देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री व्हावेत असं वाटतंय असा चिमटा भाजप नेते खासदार गिरीश बापट यांनी काढला आहे.

मुख्यमंत्रिपदाबाबतच्या इच्छेबाबत राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या वक्तव्यावरुन उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. गिरीश बापट यांनीही त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर सर्व खासदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी बापट आले होते. त्यावेळी त्यांनी हा चिमटा काढला.

- Advertisment -

ताज्या बातम्या