मुंबई | Mumbai
न्यूझीलंडमध्ये मागील 102 दिवसात एकही करोना रूग्ण आढळून न आल्याने जगभरातून न्युझीलंडवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. महिला पंतप्रधान जॅसिंडा अर्डर्न यांच्या नेतृत्वामुळं हे शक्य झाल्याचे बोलले जात आहे. याच पाश्र्वभूमीवर दिग्दर्शक केदार शिंदे यानं जॅसिंडा याचे कौतुक करत मोदी सरकारवर देखील टीका केली आहे.
केदार शिंदे यांनी ट्विट मध्ये म्हंटले आहे, “मला न्युझीलंड येथे जाऊन राहायचंय. या १०० दिवसात तिथे एकही करोना बाधित रूग्ण आढळला नाही. महिला पंतप्रधान आहे. देवी तिथे जागृत आहे. आम्ही इथे फक्त ‘बेटी बचाव बेटी पढाव’चे फतवेच काढणार.”
केदार शिंदेच्या या ट्विटने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. या वक्तव्याने त्यांना बरच ट्रोलही करण्यात आले. पण केदार शिंदे यांनीही ट्रोलर्स ना सडेतोड उत्तर दिले ट्विट द्वारे दिले आहे.
त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे, “काही लोकांच्या मेंदूचा केमिकल लोच्या झालाय. Sarcasm, तिरकसपणा या विषयी काहीच माहीती नसावी. एखादी पोस्ट टाकली की उत्तरादाखल हे बुध्दीचं प्रदर्शन मांडणार. एक मोबाईल, आईबापाने भरलेला free data, भक्तीची डोळ्यावर पट्टी बांधून यांची मोबाईलवर बोटं फिरतात! #कृष्ण जन्मून मर्दन करावं आता!” असे सडेतोड उत्तर त्यांनी दिले आहे.