Thursday, May 2, 2024
Homeक्रीडाWorld Boxing Championships मध्ये भारताला चार सुवर्णपदक

World Boxing Championships मध्ये भारताला चार सुवर्णपदक

दिल्ली | Delhi

महिलांच्या जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भारतीय बॉक्सर्सनी सुवर्ण कामगिरी केली आहे. नीतू घंघासने ४५-४८ किलो गटात आणि स्वीटी बुराने ७५-८१ किलो गटात शनिवारी सुवर्णपदक जिंकले.

- Advertisement -

त्यानंतर रविवारी (२६ मार्च) निखत जरीनने ४८-५० किलो गटात आणि लव्हलिना बोरगोहेनने ७०-७५ किलो गटात सुवर्णपदक जिंकून भारताला चौथे सुवर्णपदक मिळवून दिले.

भारताने तब्बल १७ वर्षांनंतर महिलांच्या जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये चार सुवर्णपदके जिंकली आहेत. भारताची राजधानी दिल्ली येथे पार पडलेल्या जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या बॉक्सर्सचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अभिनंदन केले आहे.

जागतिक स्पर्धा दोन वेळा जिंकणारी निखत ही मेरी कोमनंतरची पहिलीच भारतीय महिला बॉक्सर ठरली. २५ वर्षीय आसामच्या लव्हलिनाने २०१८ आणि २०१९च्या जागतिक स्पर्धेत ब्राँझपदक मिळवले आहे. लव्हलिनाने २०२२च्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णयश मिळवले. मात्र, याच वर्षी झालेल्या जागतिक स्पर्धेत तिला पहिल्याच फेरीत पराभव पत्करावा लागला होता.

गेल्या वर्षीच्या राष्ट्रकुलदरम्यान प्रशिक्षकांकडून छळ होत असल्याचा आरोप तिने केला होता. लव्हलिनाने ६९ किलो गटाऐवजी ७५ किलो या ऑलिम्पिक गटातून खेळण्याला प्राधान्य दिले. भारतीय बॉक्सरनी २००६च्या स्पर्धेत चार सुवर्णपदके जिंकली होती. त्या वेळी भारताने एकूण आठ पदके जिंकली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या