Wednesday, February 19, 2025
Homeक्रीडाICC Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा; भारताच्या स्फोटक गोलंदाजाचे...

ICC Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा; भारताच्या स्फोटक गोलंदाजाचे पुनरागमन

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ (Champions Trophy 2025) स्पर्धेचा थरार सुरु व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. येत्या १९ फेब्रुवारीपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे.

या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. मात्र बीसीसीआयने पाकिस्तानात जाण्यास नकार दिल्यामुळे या स्पर्धेचे आयोजन हायब्रिड मॉडेलमध्ये केले जाणार आहे. भारतीय संघाचे सामने पाकिस्तानात न खेळवता युएईत खेळवले जाणार आहेत. या स्पर्धेसाठी ८ पैकी ६ संघांनी आपल्या संघाची घोषणा केली होती. आता भारतानेही चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आपल्या संघाची घोषणा केली आहे.

- Advertisement -

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या या संघात विराट कोहली, केएल राहुल आणि रिषभ पंतसारख्या स्टार खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. यासह जसप्रीत बुमराहचा देखील चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघात समावेश करण्यात आला आहे.

टीम इंडियाचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमीची चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. वर्ल्ड कप २०२३ नंतर दुखापत ग्रस्त असल्याने मोहम्मद शमी हा जवळपास १४ महिने टीम इंडियाचा भाग नव्हता. मात्र आता तो पूर्णपणे फिट झाला असून त्याला पुन्हा चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी निवडण्यात आलेय. मोहम्मद शमीला २२ जानेवारी पासून सुरु होणाऱ्या इंग्लंड विरुद्ध टी-२० सीरिजसाठी देखील टीम इंडियाचा भाग बनवण्यात आलेय.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, रिषभ पंत, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शुबमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, अक्षर पटेल, केएल राहुल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, रविंद्र जडेजा

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या