Friday, May 3, 2024
Homeदेश विदेशITR वेळेत नाही भरला तर होणार "हे" तोटे !

ITR वेळेत नाही भरला तर होणार “हे” तोटे !

दिल्ली | Delhi

करोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने इनकम टॅक्स रिटर्न फाइल (ITR Filing) करण्याची अंतिम तारीख वाढविली होती. मात्र ITR वेळेत भरला नाही तर आता दंड ही होणार आणि बाकीचे फायदे मिळणार नाहीत.

- Advertisement -

जर तुम्ही वेळेत ITR भरला नाही तर…

करदात्याला दरमहा 1 टक्के दराने व्याज भरावे लागेल. प्राप्तिकर कायद्याच्या कलम 234 A अंतर्गत करदात्यास 1 टक्के दराने महिन्याला साधारण व्याज द्यावे लागेल. ITR उशीरा भरल्यास लेट फी आकारण्याची तरतूद 2018-19 आर्थिक वर्षापासून करण्यात आली आहे. 31 डिसेंबर नंतर जर ITR भरला तर करदात्याला 10,000 रुपये लेट फी भरावी लागेल. जर करदात्याचे वार्षिक उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा जास्त नसेल तर लेट फी म्हणून 1000 रू. पेक्षा जास्त लेट फी आकारली जाऊ शकत नाही.इनकम टॅक्स रिटर्न फाइल उशिरा भरल्यामुळे करदात्यास कलम 80IAC, 80IBA, 80JJA, 80JJAA, 80LA, 80P, 80PA, 80QQB आणि 80RRB अंतर्गत डिडक्शन लाभ मिळणार नाही. तसेच करदात्यास प्राप्तिकरात मिळणारी सूटही गमवावी लागेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या