Monday, May 6, 2024
Homeअग्रलेखआयुष्याला अकाली ब्रेक नको असेल तर..

आयुष्याला अकाली ब्रेक नको असेल तर..

राष्ट्रीय महामार्गावर ६१० तर विविध रस्त्यांवर एक हजारांपेक्षा जास्त ‘ब्लॅक स्पॉट’ आढळले आहेत. परिवहन विभागाने अशा ठिकाणांची यादी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दिल्याचे वृत्त माध्यमात प्रसिद्ध झाले आहे. रस्त्यावर ज्या ठिकाणी वारंवार अपघात होतात ते ठिकाण म्हणजे ब्लॅक स्पॉट. त्याची अनेक कारणे सांगितली जातात. सरळ रस्त्यावर तीव्र उतार होतो, ज्या ठिकाणाहून दुसऱ्या बाजूने येणारी वाहतूक दिसत नाही, रस्त्यावर अचानक येणारे तीव्र किंवा मोठे वळण जे चालकाच्या लवकर लक्षात येत नाही ही त्यापैकीच काही. ज्याचे निराकरण करणे सरकारची जबाबदारी आहे.

दिशादर्शक चिन्हांचे, वेगमर्यादेचे फलक लावणे, रमलर स्ट्रिप्स, ब्लिंकर्स बसविण्यात यावेत असे काही उपाय त्यावर सुचवले जातात. रस्ते अपघात आणि त्यात होणाऱ्या मृत्यूंची संख्या वाढत आहे. बळी जाणारांमध्ये तरुणांची संख्या जास्त आहे असे सातत्याने सांगितले जात आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरीही या मुद्यावर चिंता व्यक्त करतात. कमावत्या हातांचा अपघाती मृत्यू होणे हे केवळ त्या व्यक्तीच्या कुटुंबियांवर कोसळलेले दुःख तर असतेच, किंतु ते राष्ट्राचे देखील नुकसान असते. युवा पिढीमधील अती वेगाची नशा, बेदरकारपणे वाहने चालवणे, सीटबेल्ट न लावणे आणि नियम न पाळणे यामुळेही अपघात वाढत आहेत. त्याचा भीतीदायक अनुभव पादचारी रोजच घेतात. २०२४ पर्यंत देशातील रस्ते अपघातांची संख्या निम्याहून कमी होईल असा दावा नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात बोलताना केला होता. महामार्गांवरील ब्लॅक स्पॉट कमी करण्यासाठी सरकारने २५ हजार कोटी रुपये खर्च केल्याचेही त्यांनी माध्यमांना सांगितले. ब्लॅक स्पॉट कमी करण्याचे काम सरकारे करतील. पण उपरोक्त कारणे आटोक्यात आणणे ही वाहनचालकांची देखील जबाबदारी आहे. तथापि सद्यस्थिती विपरीत आढळते. भरधाव वेगात वाहने चालवणे, नियमांना हरताळ फासणे यालाच युवापिढी पराक्रम मानू लागली असावी. बहुधा त्यामुळेच रस्त्यांवर मनमानी करणाऱ्या वाहनचालकांचे प्रमाण वाढताना आढळते. पोलीस नियमाप्रमाणे कारवाई करतात. दंडही वसूल करतात. तथापि कारवाईमागचा उद्देश युवा पिढीने लक्षातच घेतला नाही तर कारवाई करणे हा फक्त उपचारच ठरणार नाही का? अपघातात तरुण व्यक्तीचा एकट्याचाच मृत्यू होतो का? त्याच्या अकाली मृत्यूने त्याचे कुटुंब उद्वस्त होते. त्याच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तींच्या स्वप्नांची राखरांगोळी होते. डोळ्यातील अश्रू कायमचे आटून जातात. अनाठायी धाडस कुटुंबाच्याही जीवावर बेतते याचे भान युवा पिढी ठेवेल का? ते काम सरकारचे नाही. बहुधा म्हणूनच रस्त्यांवर ‘मनाचा ब्रेक, उत्तम ब्रेक’, ‘घरी तुमची कोणी वाट पाहाते आहे’ असे फलक लावले जातात. ते केवळ फलक नसतात. सर्वच, विशेषतः तरुण वाहनचालकांच्या जाणीवा जागृत करण्याचा तो प्रयत्न नसतो का? रस्ते अपघात आणि त्यात होणारे मृत्यू टाळण्यासाठी सरकार आणि लोकांना एकमेकांना साथ द्यावी लागेल. हातात हात घालून प्रयत्न करावे लागतील. नियमांचे महत्व आणि त्यांचे पालन करण्यातच समाजाचे हित दडले आहे याची खूणगाठ मारलेली बरी. आयुष्याला अकाली ब्रेक नको असेल तर मनाच्या ब्रेकचा वापर कराय

- Advertisment -

ताज्या बातम्या