Wednesday, August 19, 2026
Homeब्रेकिंग न्यूजव्यवहार झालाच नाही तर रद्द का केला? - अंबादास दानवे यांचा अजित...

व्यवहार झालाच नाही तर रद्द का केला? – अंबादास दानवे यांचा अजित पवारांना सवाल

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

- Advertisement -

पुणे येथील जमीन व्यवहार प्रकरणी पार्थ पवार यांच्यावर आरोप होत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार व्यवहार झालाच नाही, असे म्हणत असतील तर तो रद्द करण्याची वेळ कशी आली? असा सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी शनिवारी एक्स या समाज माध्यमातून केला. पवारांचे हे वक्तव्य म्हणजे ’जोक ऑफ द डे’ आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

पार्थ पवार हे कोरेगाव येथील सरकारी जमिनीच्या व्यवहाराप्रकरणी चांगलेच अडचणीत आले आहेत. त्यावरून आरोप-प्रत्यारोप होत असताना विरोधकांकडून अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. अशातच अजित पवार यांनी या जमीन प्रकरणात एक रूपयाचाही व्यवहार झालेला नाही, असे सांगत हा व्यवहार रद्द झाल्याचे असल्याचे सांगितले होते. पवारांच्या या वक्तव्याचा दानवे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.

पवार म्हणतात की व्यवहार झालाच नाही. असे असेल तर मग तो रद्द करण्याची वेळ कशी आली? इतर वेळी मुद्देसूद विषय मांडणारे, नियमांवर बोट ठेवणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ही ‘बेसंबंध’ वाक्य सहनही होतात. एका अर्थाने संघाच्या मुशीत तयार झालेल्या नेत्याने भ्रष्टाचाराला दिलेला हा राजश्रय म्हणावा लागेल, अशी टिका करत डबल इंजिनकी सरकार, भ्रष्टाचार करेंगे धुवांधार’, अशा शब्दात दानवे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

ताज्या बातम्या

त्र्यंबकेश्वर येथे भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत सोई सुविधा उपलब्ध करून द्याव्यात...

0
नाशिक, दि. १९ ऑगस्ट (जिमाका वृत्तसेवा) : श्रावण मासानिमित्त त्र्यंबकेश्वर येथे मोठ्या संख्येने भाविक येण्याची शक्यता आहे. भाविकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत भाविकांना मूलभूत सोयीसुविधा...