Sunday, May 19, 2024
Homeनंदुरबारदामिनी अ‍ॅप वापराल तर वीज पडण्याच्या 15 मिनिटांपूर्वी मिळेल माहिती

दामिनी अ‍ॅप वापराल तर वीज पडण्याच्या 15 मिनिटांपूर्वी मिळेल माहिती

नंदुरबार । Nandurbar । प्रतिनिधी

मान्सून कालावधीत विशेषत: जून व जुलै या महिन्यात वीज पडण्याचे (Lightning strikes) प्रमाण लक्षात घेता जीवितहानी (Loss of life) टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने (Ministry of Earth Sciences) तयार केलेले दामिनी अ‍ॅप (Damini app) वापरण्याच्या सूचना जिल्हा आपत्ती नियंत्रण प्राधिकरणाने (District Disaster Control Authority) दिल्या आहेत.

- Advertisement -

सुरक्षात्मक उपाययोजना म्हणून सर्व शासकीय यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी, क्षेत्रीय अधिकारी, मंडळ अधिकारी, अव्वल कारकून, महसूल सहाय्यक, सरपंच, पोलिस पाटील, तलाठी, कृषिसेवक, कोतवाल, आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक, ग्रामपंचायत संगणक परिचालक आणि नागरिकांना पचा वापर करावा. दामिनी अ‍ॅप ((Damini app)) गुगल प्ले स्टोअरवरुन (Google Play Store) डाऊनलोड (Download) करता येईल. यामध्ये जीपीएस लोकेशनने (GPS location) काम करीत असून वीज पडण्याच्या 15 मिनिटांपूर्वी मध्ये स्थिती दर्शविण्यात येते. या अ‍ॅपमध्ये आपल्या सभोवतालीच्या परिसरात वीज पडण्याची सूचना प्राप्त होताच त्या ठिकाणापासून सुरक्षित स्थळी स्थालंतरीत व्हावे. यावेळी झाडाचा आश्रय घेऊ नये.

गावातील सर्व स्थानिक शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी अ‍ॅप डाऊनलोड करून त्यामध्ये प्राप्त सुचनेनुसार गावातील नागरिकांना पूर्वसूचना द्यावी आणि होणारी जीवितहानी टाळण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करावी. अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अध्यक्षा मनीषा खत्री (District Disaster Management Chairperson Manisha Khatri) यांनी सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गट विकास अधिकार्‍यांना दिल्या आहेत.

मान्सून काळात धरणांवर वायरलेस यंत्रणा कार्यान्वित करावी

येत्या मान्सून काळात प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून लघू व मध्यम प्रकल्पांची संयुक्त पाहणी करुन धरणांवरील वायरलेस यंत्रणा (Wireless systems on dams) कार्यान्वित राहील याची दक्षता घ्यावी, अशा सूचना जिल्हा आपत्ती नियंत्रण प्राधिकरणाने पाटबंधारे विभागास दिल्या आहेत.

जिल्हा आपत्ती नियंत्रण प्राधिकरणाने कळविल्यानुसार, कार्यकारी अभियंता यांनी जिल्हा परिषदेअंतर्गत येणार्‍या लघू व मध्यम प्रकल्पांची दुरुस्ती मान्सून सुरु होण्यापूर्वी करावी. यासाठी संबंधित कार्यकारी अभियंता (Executive Engineer) यांनी लघु व मध्यम प्रकल्पांची पाहणी करुन धरण, प्रकल्प सुस्थितीत असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे. धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग, नद्यांच्या पाणीपातळीनुसार सोडण्याचे नियोजन करावे. विसर्ग सोडण्यापूर्वी जिल्हाधिकारी यांची मान्यता घेण्यात यावी व त्याबाबतची पूर्व कल्पना प्रशासनास द्यावी.

नदी किनार्‍यावरील सखल भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांना नदीच्या पाणी पातळीबाबत पूर्वसूचना देण्यात यावी.रात्री, अपरात्री पुर्वसूचना देता येईल अशी यंत्रणा स्थापित करावी.यासाठी नोडल अधिकारी व कर्मचार्‍यांची नियुक्ती करावी. पुरग्रस्त गावे दर्शविलेला नकाशा जिल्हाधिकारी यांना सादर करावा.

दैनदिन पाणीसाठा, पाण्याचा विसर्ग, पर्जन्यमान इत्यादींचा दैनदिन अहवाल जिल्हा नियंत्रण कक्षास पाठवावा. धरणांवर वायरलेस यंत्रणा, पर्जन्यमापक यंत्र कार्यान्वित करावे. यंत्रणेने जिल्हाधिकारी कार्यालय व तहसिल कार्यालयातील नियंत्रण कक्षाच्या संपर्कात राहावे, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अध्यक्षा मनीषा खत्री यांनी पाटबंधारे विभागास दिल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या