Thursday, May 2, 2024
Homeधुळेआयजी बी.जी.शेखर यांच्या ‘या’ आदेशाने हिस्ट्रीसिटरांना भरली धडकी

आयजी बी.जी.शेखर यांच्या ‘या’ आदेशाने हिस्ट्रीसिटरांना भरली धडकी

धुळे । dhule । प्रतिनिधी

गुन्हे प्रलंबीत राहणार नाहीत, याची काळजी घ्यावी. गुन्हे निर्गती लवकरात लवकर करून जनतेला न्याय द्यावा.सराईत गुन्हेगारांची संख्या वाढत असून त्यांच्यापासून सर्वसामान्य जनतेच्या जिवीताला धोका होणार नाही, यासाठी सराईत गुन्हेगारांचा (history sitters) शोध घेत त्यांना जेरबंद करावे. याबरोबरच प्रलंबीत गुन्ह्यांचाचाही निपटारा करावा, अशा सुचना दिल्याची माहिती नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक (Special Inspector General of Police) बी.जी.शेखर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

- Advertisement -

Video : नाशिक परिक्षेत्राचे उपमहानिरीक्षक बहुआयामी डॉ. बी. जी. शेखर यांच्यासोबत ‘विशेष संवाद’

जिल्हानिहाय वार्षिक तपासणी करण्यासाठी आयजी शेखर पाटील हे चार दिवसांपासून धुळ्यात होते. आज त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील उपस्थित होते.

बी.जी. शेखर पाटील यांनी सांगितले की, जिल्ह्यातील साक्री, निजामपूर, साक्री, शिरपूर तालुका, आझादनगर, चाळीसगाव रोड पोलिस ठाण्याची वार्षिक तपासणी केली आहे. त्यात प्रलंबीत गुन्ह्यांचा निपटारा करावा, फरार आरोपींचा शोध घ्यावा, अशा सुचना केल्या. तसेच पोलिसांच्या अडीअडचणीही समजुन घेतल्या. धुळ्यातील संवेदनशील भागात देखील भेट देऊन आढावा घेतला आहे. याबरोबरच विविध उपक्रम हाती घेण्यात आले असून त्यात ज्या ठिकाणी वारंवार अपघात घडत आहेत. त्या ठिकाणी काय उपाययोजना करत येतील, याकडे लक्ष दिले जाईल. गुन्हे सिध्दीचे प्रमाण वाढविण्याबाबतही मार्गदर्शन केले असून यासाठी सरकारी वकील व पोलिसांशी संयुक्त चर्चा करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. जनता आणि पोलिस यांच्यात संवाद मोठ्या प्रमाणावर कसा होईल याकडे लक्ष दिले जाणार आहे. यासाठी ई-टपाल सेवा सुरु करत असून त्याचे प्रशिक्षणही दिले जात आहे. गांजा, भांग याचे समुळ नष्ट करण्यावरही आपला असून यासाठी नागरिकांना देखील आवाहन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मिसिंग, अपहरण झालेल्या मुलींच्या शोधासाठी विशेष मोहीम

जिल्ह्यातील मिसिंग झालेल्या महिला, मुली तसेच अपहरण झालेल्या मुलींचा शोध घेण्यासाठी एक महिन्याची विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून देखील पालकांशी संपर्क करून माहिती घेतली जात आहे. माहिती मिळाल्यास ते संबंधीत पोलिस ठाण्यांना कळविता. यापुढेही जावून स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलिस ठाण्यांची पथकेही तयारी केली जात आहेत. या मोहिमेतून चांगल्याप्रकारे गुन्ह्याची निर्गती होईल, असेही यावेळी आयजी बी.जी. शेखर यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या