Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याइगतपुरी रेव्ह पार्टी : मुंबईतून नायजेरीयन व्यक्ती ताब्यात

इगतपुरी रेव्ह पार्टी : मुंबईतून नायजेरीयन व्यक्ती ताब्यात

नाशिक

दक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील महिलांसह काही तरुणांना रेव्ह पार्टी करताना ग्रामीण पोलिसांनी रंगेहात पकडून अटक केल्याची घटना इगतपुरी (Igatpuri) येथे घडली. या प्रकरणी अंमली पदार्थ विकणाऱ्या एका इराणी व्यक्तीस मुंबईतून ताब्यात घेण्यात आले.

- Advertisement -

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई आग्रा महामार्गावरील (Mumbai Agra Highway) मानस रिसॉर्ट (Manas Resort) हद्दीतील स्काय ताज येथील एका बंगल्यात रेव्ह पार्टी (rave party) सुरू असल्याची गोपनीय माहिती नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील (Police Inspector Sachin Patil) यांना मिळाली होती.

निसर्गसौंदर्याचे वरदान लाभलेल्या इगतपुरीतील रेव्ह पाटर्य़ां कशा रोखणार ?

दक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील महिलांसह काही तरुणांना रेव्ह पार्टी करताना ग्रामीण पोलिसांनी रंगेहात पकडून अटक केल्याची घटना इगतपुरी (Igatpuri) येथे घडली. या प्रकरणी अंमली पदार्थ विकणाऱ्या एका इराणी व्यक्तीस मुंबईतून ताब्यात घेण्यात आले.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई आग्रा महामार्गावरील (Mumbai Agra Highway) मानस रिसॉर्ट (Manas Resort) हद्दीतील स्काय ताज येथील एका बंगल्यात रेव्ह पार्टी (rave party) सुरू असल्याची गोपनीय माहिती नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील (Police Inspector Sachin Patil) यांना मिळाली होती.

पोलिसांनी या छाप्यात कोकेन व इतर अंमली पदार्थ जप्त केले. ताब्यात घेतलेले महिलांपैकी काही महिलांनी दक्षिणत्य चित्रपट आणि बॉलिवुडमधील चित्रपटात काम केले आहे. काही महिला कोरिओग्राफर आहे. तसेच यातील एक महिला ही परदेशी (इराण) नागरीक असुन एका महिलेने रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतलेला आहे. स्काय ताज व्हीला व स्काय लगुन व्हीला येथील इतर स्टाफला देखील ताब्यात घेण्यात आले आहे.

छाप्यात मिळुन आलेले अंमली पदार्थ कोठून आणले गेले याबाबत माहिती घेऊन एक तपास पथक तात्काळ मुंबई येथे रवाना करण्यात आले. मिळालेल्या माहितीच्या आधारे मुंबई येथुन एका नायजेरियन नागरीकास पोलीसांनी ताब्यात घेवुन इगतपुरी येथे आणले व त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी इगतपुरी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक ग्रामीण जिल्हयाचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील, अपर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण श्रीमती शर्मिष्ठा वालावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे पुढील तपास इगतपुरी पोलीस ठाणेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार करीत आहे.

इगतपुरीत रेव्ह पार्टी करणाऱ्या २२ जणांना अटक

- Advertisment -

ताज्या बातम्या