Monday, May 6, 2024
Homeदेश विदेशमुख्यमंत्र्यांचा फोन न उचलणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई

मुख्यमंत्र्यांचा फोन न उचलणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई

लखनऊ –

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा फोन न उचलणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करण्यात आली

- Advertisement -

आहे. यामध्ये जिल्हाधिकारी, आयुक्त, पोलीस अधीक्षक आणि एसएसपी या अधिकार्‍यांचा समावेश आहे.

यापैकी काहींना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहेे. जिल्हाधिकारी आणि कमिश्नर सरकारी फोन उचलत नसल्याच्या तक्रारी मुख्यमंत्र्यांकडे वारंवार येत होत्या. त्यामुळे अखेर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी आपल्यासमोरच सर्वांना फोन लावण्यास सांगितले.

त्यावेळी त्यातील अनेकांनी फोनच उचलला नाही. त्यानंतर मुख्यमंत्र्यांची खात्री पटली आणि त्यांनी संबंधितांना नोटीस पाठवण्याचे आदेश जारी केले. मुख्यमंत्र्यांचा फोन उचलत नसल्याबद्दल प्रशासनाने 25 जिल्हाधिकर्‍यांना आणि 4 कमिश्नर यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली असून 3 दिवसांत त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागवले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या