चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी
दिवाळी पासून येथील बसस्थानकावर प्रवासी वर्गाची गर्दी होत आहे. बसेसमध्येही पूर्णक्षमतेने प्रवासी वाहतूक केली जात आहे. मात्र गर्दीमुळे कोरोनासंदर्भातील नियमाकडे दुर्लक्ष होत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोनामुळे सहा महिने एस.टी.महामंडळाची सेवा बंद होती. सुरुवातीला निम्म्या संख्येने व नंतर पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतुकीला परवानगी दिली गेली. दिवाळी सणाला प्रवासी संख्येत मोठी वाढ झाली. तसेच ग्रामीण भागातही बस सेवा सुरु केल्यामुळे बस स्थानक दररोज प्रवशांनी गजबत आहे.
यंदा महामंडळाने हंगामी भाडेवाढही रद्द केली होती. त्याचाही परिणामा प्रवासी संख्या वाढीवर दिसला. बसस्थानकासह बसेसमध्ये प्रवासी वर्गाची मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून येत आहे. मात्र, गर्दीमुळे कोरोनासंदर्भात शासनाकडून देण्यात आलेल्या सूचना व नियमांकडे मात्र सर्रास दुर्लक्ष होत असल्याने कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सुरुवातीच्या काळात येथील बस डोपोतर्फे प्रवाशांची कोरोना संबंधीत तपासी करण्यात येत होती. तसेच मॉस्क बाबत देखील कडक नियम पाळण्यात येत होते. आता सर्व नियम धाब्यावर बसविण्यात आल्याचे दिसून येत आहे.