Sunday, May 19, 2024
Homeनगरअवैध बायोडिझेल विक्रेत्या ढाब्यावर पोलिसांचा छापा

अवैध बायोडिझेल विक्रेत्या ढाब्यावर पोलिसांचा छापा

संगमनेर |तालुका प्रतिनिधी| Sangamner

संगमनेर (Sangamner) तालुक्यातून जाणार्‍या पुणे-नाशिक महामार्गाच्याकडेला (Pune Nashik Highway) असलेल्या चंदनापुरी (Chandapuri) शिवारातील जावळे वस्ती येथील बंद असलेल्या एका धाब्यात अवैधरित्या (Illegally) सुरू असलेल्या बायोडिझेल विक्रीचा (Biodiesel) भांडाफोड पोलिसांनी केला आहे. पोलिस उपअधीक्षक यांच्या पथकासह संगमनेर तालुका पोलिसांनी (Sangamner Taluka Police) सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास छापा (Raid) टाकून तब्बल 18 लाख 36 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त (Seized) केला आहे.

- Advertisement -

धक्कादायक ! कुर्‍हाडीचे घाव घालत लहान भावाला केले ठार

याबाबत तालुका पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील पोलीस हेड कॉन्स्टेबल मालुंजकर यांना जावळे येथील येथील हॉटेल पांडुरंगच्या पुढे काठिवाड धाब्यावर विक्रीसाठी डिझेलचा साठा (Diesel Stock) करून ठेवला असल्याची माहिती मिळाली होती. ही माहिती तालुका पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक आय. ए. शेख, पोलीस नाईक दिघे, पोलीस कॉन्स्टेबल शिरसाठ हे पेट्रोलिंग करत असताना त्यांना दिली. त्यांनी ही माहिती पोलीस निरीक्षक देवीदास ढुमणे यांना दिली. त्यानुसार त्यांनी पुरवठा निरीक्षक गणेश भालेराव व पंचासहित छापा (Raid) टाकला.

अदृश्य शक्तीने महाराष्ट्रात फिरावे

त्यावेळी पोलिसांना कोणताही परवाना नसताना अवैधरित्या डिझेलची विक्री करण्यासाठी साठा आढळून आला. पोलिसांनी 18 लाख रुपयांचे 21 हजार लिटर डिझेल, 16 हजार रुपयाच्या चार प्लास्टिकच्या टाक्या, 20 हजार रुपयांचे डिलेव्हरी पोर्टेबल मशीन व इतर साहित्य असा एकूण 18 लाख 36 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त (Seized) केला आहे.

श्रीरामपुरातील वाळूतस्कर दाभाडे, श्रीगोंद्यातील
बंटी कोथींबीरे नाशिक कारागृहात ‘स्थानबध्द’

याप्रकरणी पोलीस नाईक सचिन उगले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोजित्रा भाविनकुमार आनंदभाई (वय 29, मु.पो.29, आकृती बंगलोज कॅनॉल रोड कामरेज सूरत, गुजरात-सध्या रा. गाभणवाडी चंदनापुरी, ता. संगमनेर) व नितीन सुनील गोसावी या दोघांवर गुन्हा रजिस्टर नंबर 649/2023 भारतीय दंड संहिता कलम 420, 285, 34, जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 उल्लंघन व मुंबई वजनमापे अधिनियम 1958 नुसार दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक देवीदास ढुमणे हे करत आहे.

दरम्यान जावळे वस्ती जणुकाही अवैध धंद्याचे केंद्र बिंदू बनू पाहत आहे, अशी या परिसरातील लोक चर्चा करु लागले आहेत. या ठिकाणी चालू असलेले अवैध देशी दारू विक्री, विनापरवाना लॉजिंग बाबत येथील नागरिक त्रस्त झाले आहेत. पोलिसांनी संबंधित अवैध धंदे चालकांवर कारवाई करावी, अशी मागणी आता होऊ लागली आहे.

आरोग्यव्यवस्थेची श्वेतपत्रिका काढा; काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची मागणी

- Advertisment -

ताज्या बातम्या