Thursday, May 2, 2024
Homeनाशिकपंचवटीत अवैधरित्या दारू विक्री

पंचवटीत अवैधरित्या दारू विक्री

पंचवटी | Panchavti

आडगाव नाका परिसरात अवैधरित्या देशी व विदेशी दारू विकणारे पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

- Advertisement -

या संशयीतांकडून दोन लाख पंचेचाळीस हजार सहाशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदर कामगिरी पंचवटी गुन्हे शोध पथकाने केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, गुरूवारी (दि. १३) रोजी पोलिस नाईक रवी आढाव कर्तव्यावर असताना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, पंचवटी डेपो समोर काही संशयीत चारचाकी वाहनातून अवैधरित्या दारू विक्री करत आहेत.

त्यांनी ही माहिती पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांना कळविली. गस्तीवर असलेले गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक सत्यवान पवार, पोलिस नाईक रवि आढाव, सागर कुलकर्णी, दिलीप बोंबले, पोलिस शिपाई कल्पेश जाधव, अंबादास केदार, घनश्याम महाले, नारायण गवळी, उत्तम खरपडे यांनी पंचवटी डेपो समोरिल चव्हाण बॅटरी जवळील मोकळ्या जागेत ओमनी कार क्रमांक (एमएच १५ के ८०३८) मध्ये पाच संशयीत अवैधरित्या देशी विदेशी दारू विक्री करताना ताब्यात घेतले.

यात संशयीत मयुर साहेबराव बोधक (वय २९, रा. फ्लॅट नं. ६, सोनल सोसायटी, चौधरी मळा, मखमलाबाद रोड, पंचवटी) कपिल रोहीदास पगारे (वय २६, रा. गल्ली नं. २, अवधुतवाडी, फुलेनगर, पंचवटी), दिपक बाळु पोतदार (वय २७, रा. स्वामी नारायण मंदीर ट्रस्टच्या खोलीमध्ये चव्हाण नगर, आडगाव),

प्रितम राजेंद्र चौधरी (वय ३०, रा. ऋषिराज प्राईड, बी.विंग, फ्लॅट नं.८, पाईप लाईनरोड, गंगापुररोड), रोहन सुरेश शिंदे ( वय ३०, रा. जय जलाराम सोसायटी, ट्रॅक्टर हाऊस, भद्रकाली) यांना ताब्यात घेतले.

या संशयितांकडून एक लाख १५ हजार २००रूपये किंमतीचे देशी दारूचे ४० बॉक्स,८५ हजार ४४० रूपये किंमतीचे विदेशी दारूचे १४ बॉक्स व त्यांचे ताब्यातील ४५,०००रूपये किंमतीची ओमनी कार असा एकुण २,४५,६४० रुपये किंमतीचा मुदेमाल हस्तगत करण्यात आला.

- Advertisment -

ताज्या बातम्या