Saturday, January 24, 2026
Homeनगरगोदावरी पात्रातून अवैध वाळू उपसा; डंपरसह १५ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांवर गुन्हा...

गोदावरी पात्रातून अवैध वाळू उपसा; डंपरसह १५ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

कोपरगाव (तालुका प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील मुर्शतपूर शिवारात गोदावरी नदी पात्रातून अवैध वाळूचा उपसा आणि वाहतूक करणाऱ्या एका डंपरसह दोन व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत पोलिसांनी १५ लाख सहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

- Advertisement -

कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामचंद्र कुंभार यांना मुर्शतपूर शिवारातील गोदावरी नदीच्या पात्रातून अवैध वाळू उपसा करून त्याची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. एमएच १७ सीव्ही ९५४९ क्रमांकाचा एक डंपर वाळू घेऊन जात असल्याची सूचना त्यांना मिळाली.

YouTube video player

या माहितीच्या आधारे, पोलिस उपनिरीक्षक दीपक रोठे आणि पोहेकॉ जे.पी. तमनर यांनी तातडीने मुर्शतपूर फाट्यावर धाव घेतली. तिथे त्यांनी संशयित डंपरला थांबवून तो ताब्यात घेतला. डंपरची तपासणी केली असता, त्यामध्ये दोन ब्रास अवैध वाळू आढळून आली.

पोलिसांनी या कारवाईत डंपर आणि वाळू असा एकूण १५ लाख सहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये १५ लाख रुपये किमतीचा डंपर आणि सहा हजार रुपये किमतीची वाळू समाविष्ट आहे.

या अवैध वाळू उपसा आणि वाहतूक प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल गणेश काकडे यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, दत्तु चंदु साळुंके (रा. मनाईवस्ती, संवत्सर, ता. कोपरगाव) आणि भुषण अरूण पाटणकर या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोपरगाव पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे अवैध वाळू उपसा करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोहेकॉ जे.पी. तमनर हे करीत आहेत.

ताज्या बातम्या

Nashik BJP Politics : महापौर पदासाठी भाजप खेळणार ‘हा’ मोठा डाव;...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik महापौरपदासाठी (Mayor Post) भाजपकडून (BJP) धक्कातंत्र वापरले जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चेत आहे. पारंपरिक आणि सध्या विविध निकषांवर चर्चिल्या जाणाऱ्या...