संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner
शहरातील जमजम कॉलनी परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर कत्तलखान्यावर (Illegal Slaughterhouses) उपविभागीय पोलीस अधिकार्यांच्या पथकाने शनिवारी (दि. 31 ऑगस्ट) रात्री आठ वाजेच्या सुमारास छापा (Raid) टाकून सुमारे तीन हजार किलो गोमांस (Beef) (6 लाख रुपये) आणि पिकअप वाहन असा एकूण नऊ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त (Seized) केला आहे. संगमनेर (Sangamner) शहरातील जमजम कॉलनी परिसरातील गल्ली क्रमांक पाचमध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर कत्तलखान्यामध्ये गोवंश जनावरांची कत्तल सुरू असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांना समजली होती.
त्यानुसार त्यांनी तेथे जाऊन कारवाई करण्याची सूचना आपल्या पथकाला केली. त्यानंतर पथकाने शहर पोलिसांना (Police) सोबत घेऊन जमजम कॉलनी परिसरात जाऊन बेकायदेशीर कत्तलखान्यामधून (Illegal Slaughterhouses) सुमारे तीन हजार किलो गोमांस जप्त केले आहे. याप्रकरणी पो. कॉ. राहुल सारबंदे यांनी शहर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून सादिक मुनीर शहा (वय 25) व कमरअली गुलाम जिलानी सौदागर (रा. भारतनगर) या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत पोलिसांनी सहा लाख रुपयांचे गोमांस व तीन लाख रुपयांची पिकअप (क्र. एम एच.03, ईजी. 5163) असा एकूण नऊ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त (Seized) केला आहे.