Saturday, June 1, 2024
Homeधुळेबायोडिझेलची अवैध वाहतूक रोखली

बायोडिझेलची अवैध वाहतूक रोखली

धुळे Dhule । प्रतिनिधी

येथील तालुका पोलिसांनी अजंग शिवारात (Ajang Shivarat) बायोडिझेलची (biodiesel) होणारी अवैध वाहतूक (Illegal traffic) रोखली. टँकरसह 17 लाखांचे बॉयोडिझेल जप्त करण्यात आले. काल सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ही कारवाई (action) करण्यात आली. याप्रकरणी चालकासह दोघांना ताब्यात घेण्यात आले असून चौघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

- Advertisement -

नागपूर-सुरत महामार्गाने धुळे तालुका हद्दीतून जीजे 21 टी 5943 क्रमांकाच्या टँकरमधून राज्यात साठवणूक करणे व वाहतूकीसाठी बंदी असलेल्या बॉयोडिझेलची अवैधरित्या वाहतूक होत असल्याची गोपनिय माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप मैराळे यांना मिळाली. त्यानुसार त्यांच्यासह तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी पथकासह काल सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास अजंग शिवारात शोध घेत संशयीत टँकरला पकडले.

हॉटेल एकता समोर हे टँकर मिळून आले. त्यात बायोडिझेलचा साठा आढळून आल्याने ट्रक चालक सुरजीतसिंह चुनीलाल वसावा (वय 27 रा. अमीयार ता. साबुतारा, गुजरात) व साहील अब्दुल कादर हाफिजजी (वय 22 रा. रामपुरा चौक, सुरत) या दोघांना ताब्यात घेण्यात आले. तसेच दहा लाखांचा टँकर व 7 लाख 19 हजार 600 रूपये किंमतीचे बायोडिझेल असा एकुण 17 लाख 19 हजार 600 रूपयांचा मुद्येमाल जप्त करण्यात आला. असलम भाई याच्या सांगण्यावरून बायोडिझेलची वाहतूक करीत असल्याची कबुलील दोघांनी दिली. याप्रकरणी पोना मुकेश पवार यांच्या फिर्यादीवरून वरील तिघांसह ट्रेडर्स मलकापूर (जि. बुलढाणा) मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे पुढील तपास करीत आहेत.

ही कारवाई नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जे. शेखर पाटील, पोलीस अधीक्षक प्रविणकुमार पाटील, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप मैराळे, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिंदे, पोलीस उप निरीक्षक सागर काळे, असई पंजाबराव साळुंके, पोहेकॉ प्रविण पाटील, किशोर खैरनार, पोकॉ मुकेश पवार यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या