Sunday, May 19, 2024
Homeनाशिकमखमलाबादमधून आठ तलवारींसह इतर शस्त्रसाठा जप्त

मखमलाबादमधून आठ तलवारींसह इतर शस्त्रसाठा जप्त

नाशिक | Nashik (प्रतिनिधी)

फार्महाऊसमध्ये बेकायदेशीररीत्या लपवण्यात आलेल्या ८ तलवारी व इतर शस्त्रसाठा म्हसरूळ पोलीसांनी शुक्रवारी (दि.३१) पहाटे छापा टाकून जप्त केल्या आहेत. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

प्रणिल प्रकाश पठाडे (३२, रा. पठाडे फार्म, माळी वस्ती, मखमलाबाद) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार पठाडेकडे बेकायदा शस्त्रसाठा असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरिक्षक पंढरीनाथ ढोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने शुक्रवारी पहाटे साडेचार वाजता पठाडे फार्म येथे छापा टाकला.

यावेळी घरात लपवलेल्या ८ तलवारी, २ चाकू, १ फायटर अशी ३१ हजार ३०० रूपयांची बेकायदा शस्त्रे पोलीसांनी जप्त केली. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात पठाडे विरोधात विविध कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक उपनिरिक्षक कारवाळ करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या